
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा व श्रीमती पार्वती देवी तापडिया काॅन्हेट तेल्हारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विलास गावंडे मुख्याध्यापक हे होते तर अतिथी म्हणून आजिव सदस्य बाळासाहेब पाटील रमेशभाऊ कोकाटे, साहेबराव सोनमाळे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गजाननभाऊ पाटील उद्धवराव विखे शाळा तपासणी अधिकारी ,एस आर विखे,एस.बी पिवाल एस आर ढोले,जी आर भारसाकळ,जे एम देशमुख,ओकारराव फाटकर, मुकुंदराव कडू, भाऊराव भटकर सौ विद्या ताई देशमुख मुख्याध्यापिका, सौ पाचकोर उपस्थित होते यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्ती गितावर कवायती सादर करण्यात आले आहे
ध्वजारोहण विलास गावंडे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले तसेच महात्मा गांधी व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ,शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवर मंडळी हस्ते करण्यात आले आहे.
शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत व विचार व्यक्त केले . शहरात प्रभात फेरी काढण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शांतीकुमार सावरकर सुनील वंजारी यांनी केले आहे उपस्थित सर्व मान्यवर विद्यार्थी शिक्षक माता पालक बंधू यांना सरगम कंपनीकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त डिटर्जंट पावडर भेट दिली आहे
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले आहेत