
अकोट तालुका :-प्रतिनिधी प्रभाकर बोरकर
संपूर्ण भारत देशामध्ये भारत देश चिराई हो या गगनभरारी आवाजाने व भारताला स्वातंत्र्य मिळून आज 77 वर्षे पूर्ण झाल्याच्या जयघोषणामध्ये देवरी गावा मध्ये
नवयुग विद्यालय च्या विद्यार्थ्यांनी व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडी च्या विद्यार्थ्यांनी गावातून बँड बाजा सहवाजत गाजत अमर हुतात्मे.वीरांच्या नावांच्या जयघोष करत ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती देशाच्या संरक्षणाकरता आपले बलिदान दिले. अशा भारतमातेच्या महान सुपुत्रांना अभिवादन पर जयघोष करत गावातून शिस्तबद्धजबरदस्त प्रभात फेरी काढली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारत देशातील प्रत्येक नागरिकाला समानतेचा अधिकार लागू करून संवैधानिक अधिकार प्रदान करून देणाऱ्यामहामानव व.वीर जवानांना अभिवादन करण्यात आले. प्रथम झेंडावंदन नवयुग विद्यालयाचे आजीवन सदस्य महादेवराव अनंतराव नेरकर यांच्या हस्ते करण्यात आले. जि प शाळा चे ध्वजारोहण श्री इंगळे सर यांनी पार पाडले. झेंडावंदन झाल्यानंतर जि प शाळे च्या विद्यार्थ्यांनी कवायती साजऱ्या केल्या गावातीलप्रथम नागरिक सरपंच सौ वर्षाताई गायकवाड यांनी ग्रामपंचायत देवरी येथील ध्वजारोहण केले. जि प शाळा नवयुगविद्यालय विद्यार्थी विद्यार्थिनीव अंगणवाडी क्र. एक दोन च्या चिमुकल्यांनी ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहणाला मानवंदना दिली. तेव्हा नवयुग विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी वीर पुरुषांच्या स्मृतिनिमित्त नृत्य सादर केले.या कार्यक्रमाला मुख्याध्यापक श्री सोनवणे जीप मुख्याध्यापक श्री इंगळे . पटवारी केळकर साहेब पशुसंवर्धन विभाग
अंगणवाडी कर्मचारीआशा सेविका कुमारी बुंदेताई आरोग्य सेवक वाशेकर नवयुग विद्यालय देवरी येथील कर्मचारी रुंद उपसरपंच देवरी ग्रामपंचायत सदस्य रोजगार सेवक गावातील सुजाण नागरिक वर्ग आजी-माजी लोकप्रतिनिधी यांनी प्रामुख्याने कार्यक्रमाला हजेरी लावली.