
तेल्हारा तालुका प्रतिनिधी : नंदकिशोर नागपुरे
सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर गावाकडे सुजलाम् सुफलाम् म्हणून पाहिल्या जाते. याच गावच्या लागत सातपुड्याच्या कुशीतून वाण नदी वाहते. कधी काळी बाराही मास वाहणारी वाण नदी आता फक्त पावसाळ्यात वाहते. तेल्हारा व संग्रामपूर तालुक्या च्या सीमेवरून वाहणारी वाण नदी यंदा झालेल्या दमदार पावसाने व वाण नदीवर बांधण्यात आलेल्या वाण धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने चार महिने झाले चांगलीच वाहत होती. नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधरा शासनाने बांधला तर, मोठ्या प्रमाणावर निर्थक जाणारे पाणी वाचवल्या जाईल. मात्र, लोकप्रतिनिधी याबाबत उदासीन दिसत आहेत.
तत्कालीन जिल्हा परिषद सदस्य स्व. विजयकुमार ढाकरे यांनी १९८८ ,८९ साली कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा मंजूर करून आणला होता. बांधकाम पण सुरू झाले मात्र, त्यावेळी झालेल्या भ्रष्टाचारामुळे व निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे बंधाऱ्याचे खांब पुराच्या पाण्यात वाहून गेले. त्यानंतर तत्कालीन जि.प. सदस्या स्व. इंदिरा ढाकरे यांनी जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत पाठपुरावा केला होता. तत्कालीन राज्यमंत्री सुधाकर गणगणे यांनी बांधारा बांधण्यासाठी तीन कोटी १४ लाख रुपयाची मागणी केलीहोती. मात्र, पुरेशा निधी अभावी बंधारा पूर्ण झाला नाही. त्यानंतरच्या काही जि.प. सदस्यांनी सुद्धा बांधाऱ्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, ते सगळे प्रयत्न निर्थक गेले. शासकीय पातळीवर कोणत्याही प्रकारची ठोस पावले आजपर्यंत उचल्या नसल्याचे ग्रामस्थांचे आरोप आहेत. याकडे पालकमंत्री, खासदार , व आमदारांनी यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे.
१२ गावांना होणार फायदा
दानापूर येथील वाण नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधल्यास एकूण १२ गावांना फायदा होणार आहे. यामध्ये दानापूर, सोगोडा, बोरखेड, हिंगणी बु.. हिंगणी खु., वडगाव वाण, सोगोडा , चांगलवाडी, काटेल, कोलद इत्यादी गावांना फायदा होणार असून, या परिसरातील शेतकरी समृद्ध होईल यात शंका नाही.
1)
प्रतिक्रिया..
तेल्हारा तालुक्यात ज्या ठिकाणी नदी आहे सोबतच सातपुड्याच्या कुशीतून वाहणाऱ्या बावन्न नाल्यांवर जलसंधारणाची व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे बांधल्या गेले तर, वाहून जाणारे कोट्यावधी लिटर पाणी साठवल्या जाईल. त्यामुळे विहीर, बोअरवेल, यांच्या पाणी पातळीत निश्चितच वाढ होईल सिंचनाचे क्षेत्रात वाढ होईल व शेतकरी, शेतमजूर समृद्ध होईल.
अनिल गावंडे
संस्थापक अध्यक्ष लोकजागर मंच
2)
आमचे दानापूर गाव हे तालुक्यातील पहिल्या क्रमांकाचे गाव आहे या ठिकाणी भाजीपाला व फळबाग पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात या पिकांना पाणी मोठ्या प्रमाणावर घ्यावे लागते सदर बंधारा बांधल्या गेला तर मोठा फायदा होईल .
डॉ. अजय विखे
अध्यक्ष श्रमशक्ती शेतकरी गट
शेतकरी दानापूर.
3) वाण नदीवर जलसंधाराचे काम झाल्यास तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ही मोठी पर्वणी ठरणार आहे त्यामुळे येथील शेतकरी सुखी होईल
योगेश येऊल
ग्रामंचायत सदस्य दानापूर
4)
दानापूर ग्रामपंचायत ने वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांना सदर विषयाची सविस्तर माहिती दिल्या नंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी स्थळ पाहणी सुद्धा केली असल्याचे समजते.
श्यामकुमार ढाकरे
सामाजिक कार्यकर्ते दानापूर