
हाता प्रतिनिधी :-भिमकिरण दामोदर
भारतीय बौद्ध महासभा ग्राम शाखा हाता यांच्या वतीने भव्य दोन दिवसीय महापरित्राण पाठ, महासंघदान व धम्म परिषद मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या धम्म परिषदेस परिसरातील हजारो बौद्ध अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत कार्यक्रम यशस्वी केला.
या परिषदेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजनांचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी उपस्थित राहून समाजबांधवांना धम्म, सामाजिक ऐक्य आणि संविधानिक हक्कांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी बौद्ध समाजाने शिक्षण, संघटन आणि संघर्षाच्या माध्यमातून प्रगती साधावी, असे आवाहन केले.
धम्म परिषदेच्या अध्यक्षस्थानी अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष पी. जे. वानखडे सर होते. तसेच भंते राजज्योतीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत व भिक्षू संघाच्या उपस्थितीत महापरित्राण पाठ पार पडले. संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार डोंगरे, संस्कार विभाग सचिव विलास बावस्कर, कार्यालयीन सचिव सदाशिव मेश्राम तसेच बाळापूर तालुकाध्यक्ष राहुल इंगळे आणि संपूर्ण तालुका कार्यकारिणी यांनी विशेष परिश्रम घेतले.