
तेल्हारा प्रतिनिधी:-
नगराध्यक्षांकडे मागणी
तेल्हारा दि :- जनहितार्थ तसेच नगरपालिकेचे हित सुद्धा लक्षात घेता पाणी बिलावरील ९५ टक्के सरचार्ज माफ करा अशी मागणी पाच नगरसेवकांनी नगराध्यक्षा वैशाली पालीवाल यांना निवेदन देऊन केली आहे.
पाणीपुरवठा विभागातील पाणीपट्टी मोठ्या प्रमाणात थकीत असून त्याची वसुली करणे आवश्यक आहे नगर पालिकेने यापूर्वी ज्याप्रमाणे शहरातील पाणी बिलावरील सरचार्ज हा ९५ टक्के माफ करून नागरिकांचेही हित जोपासले व नगरपालिकेने चांगल्या प्रकारे पाणी पट्टी वसूल केलेली आहे त्याच अनुषंगाने पालिकेच्या अध्यक्षांनी ९५ टक्के सरचार्ज माफ करण्याचा विषय हा सभेमध्ये विषय पत्रिकेवर घेऊन सभेमध्ये ठेवून तशा प्रकारचा ठराव घ्यावा जेणेकरून जनतेची हीत जोपासले जाईल व नगरपालिकेची आर्थिक स्थिती सुद्धा आणखी बळकट होईल व विकास कामांमध्ये भरभराटी येईल अशा प्रकारची मागणी पालिका अध्यक्ष व पाणीपुरवठा सभापती अमित अग्रवाल यांच्या कडे निवेदनाद्वारे पालिकेच्या गटनेत्या कान्होपात्रा फाटकर पालिका सदस्य कैलास ठोकने राजेश खारोडे रिनाताई आसरे पंचफुला कवर यांनी केली आहे.