
तेल्हारा तालुक्यातील आदर्श ग्राम पाथर्डी येथे श्रीमद् भागवत कथेला दिनांक 23/01/2026 रोजी प्रारंभ झाला असून या भक्तीमय श्रीमद् भागवत कथेचे आयोजन ग्राम पाथर्डी वासियांच्या वतीने करण्यात आले असून या कथेचे कथा प्रवक्ते ह.भ.प श्री.रामकृष्ण महाराज आंम्बुस्कर (अकोला) यांच्या अमृततुल्य वाणीतून कथा प्रवचन भागवत कीर्तन दररोज सकाळी 9 ते 12 पर्यंत, दुपारी ३ ते सायंकाळी 5 पर्यंत व सायंकाळी हरीपाठाचे व रात्रीचा हरी कीर्तनाचा कार्यक्रम 8.30 ते 10.30 दरम्यान राहील. या अखंड नामसकीर्तन सप्ताहातील नामवंत कीर्तनकार यांचे हरीकीर्तनास सुरुवात शुक्रवार दिनांक 23/01/2026 रोजी होत असून कीर्तन रुपीस सेवा ह.भ.प बळीराम महाराज गायकवाड (बावनबिर) यांची पहिली सेवा राहील.दिनांक 24/01/2026 शनिवार रोजी ह.भ.प कु. श्वेताताई महाराज शिरसागर (आळंदी) यांचे हरिकीर्तन राहील.दिनांक 25/01/2026 रविवार रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज जावरकार (कान्हेरी गवळी) यांची कीर्तनरूपी सेवा राहील राहिल, सोमवार दिनांक 26/01/2026 रोजी ह.भ.प ज्ञानेश्वर महाराज पातोंड (वरुड जवळका )यांची कीर्तन रुपी सेवा असून, मंगळवार दिनांक 27/01/ 2026 रोजी ह.भ.प गुरुवर्य तुकाराम महाराज सखारामपुरकर (इलोरा) यांची किर्तन सेवा राहिल. बुधवार दिनांक 28/01/2026 रोजी ह.प राजेंद्र महाराज वक्टे (पाळोदी) यांचे कीर्तन असुन गुरुवार दिनांक 29/01/2026 रोजी धर्माचार्य ह.भ.प गणेश महाराज बावस्कर (लाडनापुरकर झी टॉकीज फेम) यांची कीर्तन रुपी सेवा राहील. शुक्रवार दिनांक 30/01/2026 रोजी ह.भ.प रामकृष्ण महाराज आंबुस्कर (अकोला) यांचे सकाळी 10 ते 12 काल्याचे किर्तन राहील. कथेची सांगता तसेच महाप्रसाद शुक्रवार दिनांक 30/01/2026 वेळ सकाळी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत राहील.तरी सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी या श्रीमद् भागवत कथा व अखंड नामसंकीर्तन सप्ताहाचा तसेच किर्तनरुपी सेवेचा अवश्य लाभ घ्यावा. असे आयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे. या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता गावातील तरुण मंडळी गावकरी, टाळकरी मंडळी मनोभावे सेवा देतात.