
तेल्हारा प्रतिनिधी:-
तेल्हारा. तळेगाव बुद्रुक येथील प्रयोगशील शेतकरी विलास खारोडे यांची केळी पिकाची उत्तम मशागत करून केळी पिकाचा निर्यात माल निर्यातक्षम कसा तयार होईल. त्याकरिता त्यांनी भरपूर मेहनत घेतली. केळी पिकाची लागवड ते मशागतीपर्यंत व्यवस्थित व्यवस्थापन केल्यामुळे सदर पीक निर्याक्षम बनले व आज त्यांची केळी प्रदेशात रवाना होत आहे. केळी पिकाची व्यवस्थित कापणी करून घड स्वच्छ करून बॉक्स पॅकिंग करण्यात आले. सदर बॉक्स ट्रक मध्ये लोड करून 1500 क्विंटल केळी दिल्लीकडे रवाना झाली. नंतर दिल्लीवरून कंटेनर ने केळी फळ पिकाचा प्रवास विक्री करिता इराण या देशात रवाना होत आहे. सदर क्षेत्रावर विलास खारोडे यांनी चांगले उत्पन्न घेतल्यामुळे सदर बागेला तालुका कृषी अधिकारी तेल्हारा शुभम बुरांडे तसेच मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी भेट देऊन सदर शेतकऱ्यांचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना शेतकरी बांधवांनी पारंपारिक पिकासोबतच फळ पिकाची जोड दिल्यास आपल्या आर्थिक उत्पन्नात निश्चितच वाढ होऊ शकते याबाबत शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकारी गौरव राऊत यांनी प्रोत्साहित केले. तसेच आपल्या मार्गदर्शनात तालुका कृषी अधिकारी शुभम बुरांडे यांनी फळ पिकाच्या अनुदानाबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली व शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त फळ पिकाचे उत्पन्न चांगल्या दर्जाचे व निर्यातक्षम घ्यावे जेणेकरून आपल्याला बाजार भाव जास्तीचा मिळून आपला आर्थिक स्तर उंचावेल यासाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी प्रयत्न करावा असे आव्हाहन करून असताना कृषी विभाग आपल्या सोबत सदैव तत्पर राहील याची हमी त्यांनी दिली. सदर केळी पिकाचे परदेशात निर्यात करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन प्रगतिशील शेतकरी सचिन कोरडे यांचे लाभले.सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कुमार सारभुकन. यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास खारोडे यांनी केले सदर कार्यक्रमाला जनार्दन खारोडे,बाबुरावजी खारोडे, भास्कर खारोडे, किशोर खारोडे, सुधीर खारोडे, सदानंद खारोडे, व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते