
तेल्हारा प्रतिनिधी:-
तेल्हारा शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील नागरिकांच्या वतीने नगर परिषद अध्यक्ष यांना निवेदन देऊन गार्डनचे गार्डन चे सौदर्यीकरण करून लहान मुलांसाठी खेळणे बसवण्याची नागरिकांची मागणी करण्यात आली आहे.
प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्र संत तुकडोजी महाराज ज्ञानपीठ शाळा क्रमांक १ समोर उभारण्यात आलेल्या गार्डन मध्ये सौदर्यीकरण करून लहान मुलांसाठी खेळणे बसविण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे . तेल्हारा शहराच्या मध्यभागी हा परिसर असून या भागात एकही सुजज्ज गार्डन नसल्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी ,जेष्ठ नागरिकांना विरंगुळा म्हणुन फिरण्यासाठी जागा नाही. तरी त्याठिकाणी उभारण्यात आलेल्या गार्डनची सौदर्यीकरण करून लहान मुलांसाठी खेळणे बसवण्यात यावी अशी मागणी प्रभागातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे .
तेल्हारा शहरात नव्याने स्थापन झालेल्या सत्ताधाऱ्याकडुन या गार्डन चे काम त्वरित पूर्ण करून सुंदर सुसज्ज गार्डन लवकरात लवकर उभारतील का याकडे सुद्धा प्रभागातील संपूर्ण जनतेचे लक्ष लागले आहे .यावेळी संकेत अवचार सचिन थाटे, गजानन मोरखडे, निलेश धनभर महेश सिसोदिया आदित्य देशमुख हरिओम अवचार भावेश सिसोदिया दिनेश छागाणी
ऋतिक अवचार दिनेश रत्नपारखी, अनमोल जयस्वाल, सूरज काइंगे भावेश पवार शुभम शर्मा गोपाल छांगानी मनीष बासू शुभम वाणे गौरव देशमुख अक्षय मोरे कुणाल पवार यांच्यासह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते