
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील वस्तापुर येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत समाज प्रबोधनपर विदर्भ स्तरीय २ दिवसीय खंजरी भजन स्पर्धा वस्तापूर येथे पार पडली. विविध गावच्या भजन मंडळांनी मोठ्या उत्साहाने स्पर्धेत सहभाग नोंदवला.
वस्तापूर येथे दिनांक १६/१/२०२६ ते १७/०१/२०२६ पर्यंत सदर स्पर्धा संपन्न झाली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत भव्य विदर्भस्तरीय खंजरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी गुरूदेव सेवा भजन मंडळाकडून हे आयोजन केले होते. यामध्ये वस्तापूर येथील सार्थक भजन मंडळाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. स्व बाबाराव झामरकर, स्व मंगल झामरकर व स्व. श्रावण येवले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित या स्पर्धेत मेळघाटातील चिखदरा तालुक्यात पार पडली खंजरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली. विदर्भातील नामांकित मंडळांनी सहभाग घेतला होता. मेळघाट विधानसभेचे आमदार केवलराम काळे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे २१ हजार १५१ रुपयांचे पारितोषिक सार्थक भजन मंडळ, वस्तापूर विदर्भस्तरीय भजन स्पर्धेत भजनाचे सादरीकरण करताना भजन मंडळी यांना देऊन गौरविण्यात आले. यावेळी उद्घाटक यशवंत भाऊ काळे,विनोदजी खेळकर गटविकास अधिकारी चिखलदरा,विठ्ठल जाधव पंचायत विस्तार अधिकारी चिखलदरा,रजंना पातोडे हे होते तर सरपंच केवल झामरकर, उपसरपंच गजाननभाऊ येवले, नकुल गायन, ग्राम पंचायत अधिकारी सुधीर भागवत, तसेच परिसरातील भजनप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जानोना आणि तिसरे म्हणजे यवतमाळ या स्पर्धेत द्वितीय क्रमांक राष्ट्रसंत भजन मंडळ, जनोना, तृतीय क्रमांक महाराणा भजन मंडळ, यवतमाळ, चतुर्थ क्रमांक स्वर गुरुकुंजाचे भजन मंडळ, मोझरी, पाचवा क्रमांक राष्ट्रसंत जन्मस्थान भजन मंडळ, यावली, सहावा क्रमांक गुरूदेव सेवा भजन मंडळ, शेंदोळा खुर्द, सातवा क्रमांक गुरूदेव सेवाश्रम भजन मंडळ, यावली, आठवा क्रमांक गुरूदेव सेवा भजन मंडळ, बोरी, नववा क्रमांक श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ, वडगाव (फ), दहावा श्री गुरूदेव सेवा भजन मंडळ, उपातखेडा, अकरावा गुरूदेव सेवा भजन मंडळ, आंबापाटी, बारावा क्रमांक सावंगी मोहाडी, तेरावा क्रमांक बाल भजन मंडळ, आलाडोह यांनी पटकावले.
१८/०१/२०२६ रोजी वस्तापूर येथील सर्व शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन होते. कार्यक्रमाकरीता आमदार केवलराम काळे यांची उपस्थिती होती. याप्रसंगी त्यांनी ग्रामपंचायतीला सुद्धा भेट दिली व कामकाज बद्दल चर्चा केली. तसेच स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.