
!
राजकुमार चिचोळकर:-
बाळापूर तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वाडेगाव शेत शिवारात बिबट्या निदर्शनास आला असल्याची माहिती प्राप्त झाली असून परिसरात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील माजी उपसरपंच अरुण भाऊ पळसकार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाडेगाव बटवाडी शेत रस्त्याने शेतात जात असताना समोर हाकेच्या अंतरावर रस्त्याने बिबट्या निदर्शनास आला. व लगेच रस्ता लगत असलेल्या शेतातील तूर पिकात घुसला असल्याचे त्यांनी सांगितले. तर दोन दिवसांपूर्वीच दिनांक १८ जानेवारी रोजी तालुक्यातील बटवाडी शेत शिवारात दोन बिबटे शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले असल्याची माहिती आहे. एकंदरीत बाळापूर तालुक्यातील बटवाडी चिंचोली पिंपळगाव तामसी तसेच वाडेगाव शेत शिवारात बिबट्या निदर्शनास येत असल्याने शेतकरी व शेतमजूर यांच्या मध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत रब्बी हंगामातील पीकांच्या मशागतीच्या कामांची लगबग सुरू असल्याने शेत शिवारात शेतकरी तसेच मजूर वर्गाची वर्दळ अधीक प्रमाणात दिसून येत आहे. शेत शिवारात वन्यप्राणी बिबट्या चा मुक्त संचार निदर्शनास येत असल्याने दुदैवी प्रसंग शेतकरी किंवा शेतमजूरावर निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे संमधीत विभागाकडून परिसरात शोध मोहीम राबविण्यात येवून परिसरातील बिबट्या चा बंदोबस्त करण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकरी तसेच मजूर वर्ग यांच्या कडून करण्यात येत आहे.
दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास वाडेगाव बटवाडी शेत रस्त्याने शेतात जात असताना समोर हाकेच्या अंतरावर रस्त्यावर बिबट्या दिसला व लगेच बाजूच्या शेतात बिबट्या घुसला .
त्यामुळे संमधीत विभागाकडून परिसरात निदर्शनास येत असलेल्या बिबट्या चा शोध घेवून तातडीने बंदोबस्त करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अरुण भाऊ पळसकार
माजी उपसरपंच वाडेगाव