
महाजन :-हिंगणघाट प्रतिनिधी :- हिंगणघाट तालुक्यातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडनेर येथे मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार व युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धाचे 2 दिवसीय दिनांक 18 ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजन करण्यात आले.
सर्वप्रथम स्वामी विवेकानंद व विद्येची देवता माता स्वरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रिडांगण पूजन करून क्रीडा स्पर्धा सुरु करण्यात आली. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.गजानन लोणबळे,
उदघाटक श्री.गोपाल वनकर,
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कल्पना मडावी मॅडम,सौं मंजुषा महाजन मॅडम सौं योगिता काटेखाये मॅडम ह्या उपस्थित होत्या तर
प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य गुरुदयाल सिंग जुनी, युवा प्रेरणा विद्यार्थी सेवा संस्थाचे अध्यक्ष राहुल दुरतकर यांची उपस्थिती होती.
मेरा युवा भारत,युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांच्या कार्यक्रमाची माहिती राहुल दुरतकर यांनी आपल्या प्रास्ताविक भाषांनातून दिली. क्रीडा स्पर्धेत विविध खेळ घेण्यात आले त्यात कब्बड्डी, खो- खो, रनींग आणि गोळा फेक हे खेळ घेण्यात आले. यामध्ये विद्यालय व आंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. दिनांक 19 जानेवारी 2026 ला उर्वरित सामने घेऊन बक्षीस वितरण करण्यात आले. कब्बड्डी मध्ये प्रथम क्रमांक इंदिरा कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ तर उपविजेता इंदिरा माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी संघ,विजयी झाला तसेच खो-खो स्पर्धेत प्रथम वीर राणी दुर्गा संघ तर उपविजेता इंदिरा महिला संघ, रनिंग मध्ये महिला व पुरुष प्रथम,द्वितीय , तृतीय तर गोळा फेक मध्ये महिला व पुरुष प्रथम,द्वितीय व तृत्तीय असे वर्गीकरण करून बक्षीस वितरण करण्यात आले.
यामध्ये परीक्षक विकास तिजारे, क्रीडाप्रमुख प्रा.डी.एच राठोड,श्री दीपक ताकसांडे, श्री गोपाल वनकर,निलेश ताकसांडे
के.टी.महाजन प्राथमिक शाळा वडनेरचे मुख्याध्यापक श्री चव्हाण सर हे होते.
खेळ हा माणसांच्या जीवनातील अविभाज्य भाग असून यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे मत माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष गुरुदयाल सिंग जुनी यांनी व्यक्त केले.
सदर कार्यक्रमात प्रा.प्रणाली कडू
प्रा.छत्रपती दौलत्कार प्रा.स्मिता लाहोरे प्रा.रमा खोब्रागडे,प्रा.अपूर्वा कुलकर्णी
शिक्षक,श्री मोहन तलवटकर,श्री ओंकार मडावी,श्री दीपक बारतीने शिक्षकेतर कर्मचारी कृष्णा शेंडे, प्रज्वल जीवतोडे आणि शाळेतीलं विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.छत्रपती दौलतकार तर आभार प्रदर्शन प्रा.दिनेश राठोड यांनी व्यक्त केले. सरते शेवटी राष्ट्रागीतानी कार्यक्रम संपन्न करण्यात आला.