
राजु भास्करे.अमरावती जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्हा चिखलदरा तालुक्यातील सोळा ग्रामपंचायत गावाच्या ठिकाणी नविन ग्रामपंचायत इमारतीचे कामे सुरू असुन कुठे इमारतीचे काम झाले तर कुठे इमारतीचे काम काही कारणाने रखडलेले आहेत.
परंतु बागलींगा येथे काही वर्षांपासून या गावाला ग्रामपंचायत म्हणून कशी बशी होती काही महिन्यांपूर्वी बागलिंगा ग्रामपंचायत या गावाला होतकरू ग्राम विकास अधिकारी म्हणून सुनिल महल्ले हे आल्याने येथील नवीन इमारत ग्रामपंचायतींचे कामाला हात बळ लावून येथिल नवीन इमारत ग्रामपंचायतींचे कामे कंत्राटदारांकडून पुर्णपणे करुन घेतले व आज २०/१/२०२६ रोजी मेळघाट चे आमदार केवलराम काळे व गटविकास अधिकारी खेरडे साहेब यांच्या हस्ते या नवीन ग्रामपंचायत इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला.
बोलल्या जात आहे की बागलिंगा येथिल ग्रामपंचायत चिखलदरा तालुक्यात एक नंबर ची आपल्याला पाहवयास मिळते.
या नवीन इमारत ग्रामपंचायतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन करीता आमदार केवलराम काळे, गटविकास अधिकारी खेरडे साहेब, संरपच निर्मला धांडेकर, उपसरपंच राजु जावकर,पंचायत विस्तार अधिकारी रंजना पातोड मॅडम, कार्यकारी अभियंता मेश्राम साहेब, ग्राम विकास अधिकारी सुनिल महल्ले यांच्या हस्ते पार पडले.
तसेच या नवीन इमारत ग्रामपंचायतींचे लोकार्पण सोहळ्यात उपस्थित म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य सहायक पंचायत विकास अधिकारी धुर्वे मॅडम, प्राथमिक शाळेतील शिक्षक वृंद व गावकरी बहुसंख्येने उपस्थित होते.