
दानापुर प्रतिनिधी.नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील दानापुर येथे सालाबाद प्रमाणे यावर्षी सुध्दा धर्म नाथ बीज महोत्सव साजरा करण्यात आला.सर्वप्रथम बबलु वैलकर यांच्या निवास स्थाना वरुण पालखी मिरवणूक काढण्यात आली.पालखी मिरवणूक शिवाजी महाराज चौक,गांधी चौक,आठवडी बाजार मार्गाने वैलकर यांच्या निवास स्थानी विसर्जन करण्यात आले.पालखी मध्ये पारंपरिक वाद्यांच्या नांदात काढण्यात आली यामध्ये ढोलाचे भजन, साप्रदायिक भजन,बाँड पार्टी, यांचा समावेश होता.संपूर्ण गावात महिला पुरुष भक्तांनी पालखी पुजन केले.त्यानंतर रात्री ह.भ.प.विष्णु महाराज निमकर्डे अडगाव खु यांचा किर्तनाचा कार्यक्रम करण्यात आला.तसेच दुसऱ्या दिवसी सकाळी काल्याचे कीर्तन ह.भ.प.श्री. वैष्णव महाराज श्रत्विज अकोट यांनी केले.व त्यानंतर गावातील नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन समस्त नाथ सांप्रदाय मंडळी व गावकरी यांच्या वतिने करण्यात आले होते.