
तेल्हारा प्रतिनिधी – तेल्हारा तालुक्यातील तुदगांव
येथील रहिवासी दीपक मोकळकर (३८) हा तरुण बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तेल्हारा पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे. माहितीनुसार, प्रविण मोडकळकर हा १८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९ वाजता अकोला येथे जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला होता. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी न परतल्याने व मोबाइल बंद लागल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. नातेवाइक व मित्रमंडळींकडे चौकशी करुनही त्याचा शोध लागला नाही. अखेर कुटुंबीयांनी तेल्हारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील संभाव्य ठिकाणे, संपर्कातील व्यक्ती तसेच इतर मार्गांची तपासणी सुरू केली आहे. मध्यम उंची, सडपातळ बांधा. अंगात फिकट गुलाबी रंगाचा कुर्ता, पांढरी पँट व पांढरे शूज परिधान केले आहे. या तरुणाबाबत कोणास काही माहिती मिळाल्यास तत्काळ तेल्हारा पोलिस ठाणे किंवा नजीकच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.