
भिमकिरण दामोदर:- हाता प्रतिनिधी :-
हाता येथील अनंता गोविंदराव कुचके ह्याचे घर फोडून त्याची जुनी तिजोरी फोडून सोने चांदी न नगदी मिळुन सहा ते सात लाख रुपये चोरी झाल्याचे पुढे येत आहे
तर कांताबाई शालीकराम कुचके
ह्यांचे घर फोडून सुध्दा सोने चांदी व नगदी ऐवज असे दिड दोन लाख रुपये
तर बळीराम तळोकार ह्यांचे घर फोडले
तर बाळासाहेब धर्माळे ह्याचे आरो
चे जवळ जाऊन तोडण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांचे येथील सी सी टि वि कॅमेरा मध्ये येत असल्याचे समजताच त्यांनी तिथुन पळ काढला असावा असे वाटत असून गावाचे बाहेर पळून जाण्यासाठी
गौतम दामोदर हयांच्या गाडी नं
व गणेश सुरसकार ह्यांची गाडी नं घेऊन हाता फाटा पर्यंत जाऊन दोन्ही गाडया रोहनकार ह्यांचे शेतात ठेवून दिल्यात व तिथुन पसार झाले.सकाळी पोलीस स्टेशन उरळ येथे माहिती मिळताच ठाणेदार पंकज कांबळे व त्यांची टिम ठिकाणी हजर होऊन पंचनामा करीत फाॅरेसिंक टिम त्यांचे मोबाईल व्हॅन सह
तसेच श्वान पथक आपले टिम सुद्धा काही वेळात हजर होऊन तपास करीत आहेत
परंतु हाता येथील गजबजलेल्या वस्तीमध्ये असणाऱ्या घरी चोरी करणे
हे गावा वासीयासाठी नवलाची तर
एवढी चोरी करणारे चोर पकडणे हे पोलिसांसमोर एक आव्हान च आहे