
दानापुर प्रतिनिधी…नंदकिशोर नागपुरे
मातृ सप्ताहाच्या निमित्ताने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा मालेगाव बाजार येथे विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये विद्यार्थ्यांना परंपरागत खाद्यपदार्थांची ओळख व्हावी तसेच त्यांना व्यवहार ज्ञान मिळावे यासाठी बाल आनंद मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते
परंपरागत भारतीय खाद्यपदार्थांची ओळख व्हावी ते बनवण्याचे ज्ञान प्राप्त व्हावे तसेच खरेदी विक्री व्यवहार याबद्दल ज्ञानात वृद्धी व्हावी म्हणून जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा माळेगाव बाजार येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यामध्ये शाळेतील बहुतांश विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला विविध खाद्यपदार्थांची रेलचेल या आनंद मेळाव्यात होती व्यवहार ज्ञाना साठी या उपक्रमाचे एक आगळे वेगळे महत्व आहे खरी कमाई हा स्काऊट चा उपक्रम देखील या निमित्ताने संपन्न झाला कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सुरेश खोडे सर मुख्याध्यापक सचिन ठोंबरे सर शाळेतील शिक्षिका उषाताई बोरेकर रेखाताई महाजन अपर्णाताई इंगळे संगीताताई ठोंबरे सारिकाताई वासनकर विजयाताई काळपांडे माधुरीताई काकडे साक्षीताई भगत शिक्षक वृंद अमोल शामस्कर सर विशाल नागले सर राजेश मुकुंदे सर रामेश्वर कीर्तने सर कैलास वाघमारे सर श शालेय पोषण आहार कर्मचारी राम इंगळे पालक कलीम भाऊ तसेच बहुसंख्य पालक कार्यक्रमासाठी उपस्थित होते