
तेल्हारा ता.प्रतिनिधी..नंदकिशोर नागपुरे
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा माळेगाव बाजार येथे विविध उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकासात तसेच व्यक्तिमत्त्वाचे जडणघडणीत त्यांच्या मातांचे महत्त्वाचे योगदान असते. सध्या सर्वत्र मकर संक्रांतीच्या सणाची धामधूम सुरू आहे याचे औचित्य साधून पि एम श्री जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक केंद्र शाळा माळेगाव बाजार येथील सर्व महिला शिक्षिकांनी माता पालक मेळाव्याचे यशस्वी आयोजन केले होते सर्व मातांना शाळेमध्ये बोलावून विद्यार्थ्यांची शैक्षणिक विकासात मातांची भूमिका याबद्दल उषाताई बोरेकर, रेखाताई महाजन अपर्णाताई इंगळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच माता-पालक संघाचे कामकाज यावरही विजयाताई काळपांडे यांनी प्रकाश टाकला मातांचे मनोरंजनासाठी संगीत खुर्ची प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. माता पालक मेळाव्याला माता पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमासाठी शाळेतील उषाताई बोरेकर अपर्णाताई इंगळे संगीता ताई ठोंबरे विजयाताई काळपांडे सारिकाताई वासनकार रेखाताई महाजन माधुरीताई काकडे साक्षी ताई भगत यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख सुरेश खोडे सर शाळेचे मुख्याध्यापक सचिन ठोंबरे सर शाळेतील शिक्षक अमोल शामस्कर सर विशाल नागले सर राजेश मुकुंदे सर रामेश्वर कीर्तने सर कैलास वाघमारे सर शालेय पोषण आहार कर्मचारी रामदादा इंगळे बाळूमामा गिऱ्हे यांचे मोलाचे योगदान लाभले.