
प्रतिनिधी :-प्रभाकर बोरकर
अकोट तालुक्यामधील पैष्णवी. तीर्थक्षेत्रे अनेक वर्षांपासून विकास कामांमुळे दुर्लक्षित होते परंतु आता खासदार साहेब आमदार साहेब यांच्या सहकार्यामुळे तीर्थक्षेत्राच्या विकासाला खूप मोलाचे सहकार्य लाभले त्यामुळे आज रोजी तीर्थक्षेत्र पाणेट एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र म्हणून अजरामर आहे. श्री संत गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव या तीर्थक्षेत्राच अतिशय महत्त्वपूर्ण नाळ जुळलेली आहे सन १९४० मध्ये पुंडलिक बुवा भोकरे, त्र्यंबकराव वडाळकर, गोविंदराव ढोरे, नामदेवराव खोकले, नारायणराव अंबळकार, अवधूत किसन अंबळकार व बायजाबाई इतर काही भक्तांबरोबर ह्या श्री क्षेत्र पानेटयेथे तीर्थक्षेत्रावर आले. पौष महिन्याच्या ८ फेब्रुवारी १९४० वार सोमवार)पर्वावर स्नान करण्यासाठी दहा-बारा बैलगाड्या उभ्या केल्या होत( सोमवतीअमावशय )बायजाबाईंनी पुर्णा नदीत स्नान करून नदीच्या काठावर हळदीची पिंड करुन पुजाअर्चा केली. तेथे सोबतची लहान मुले बैलगाड्यांवर उड्या मारून धिंगाणा घालीत होती. बायजाबाईंनी त्यांच्या नात्यातील दामोदर हाडोळे व दुसरा मुलगा श्रीराम खलोकार यांची आपापसात होणारी झटापट पाहिली. तेव्हा बाईंनी त्या मुलांना खडसावले आणि दामोदर व श्रीराम यांना रागाने एक थापड मारली, आणि त्या बैलगाडीच्या आडोशाला एका चाकाला टेकून बसल्या. दुपारचेदोन वाजले होते. एकाऐकच त्यांना त्रास होऊ लागला. व ऐकाएकी छातीत कळ येऊन त्यांना हृदयविकाराचा झटका आला. व त्यांची प्राणज्योत मालवली. हा प्रसंग दुखत आहे घडला हिमाहिती वरवर जरी सामान्य वाटत असली तरी त्यामागे निश्चित असा तर्क असावा कदाचित त्यांना आपला देह तेथेच विसर्जित करायचा असेल? मुलांचा धिंगाणा घालण्यामुळे त्यांनी रागावून मुलांना थापड मारली व त्याचे दुःख झाल्याने त्यांना हृदयविकाराचा झटका आला असे जमलेल्या सर्वांना वाटले.? सर्वत्र दुःखाची कळा पसरली सोबतची मंडळी रडू लागली. एकच आक्रोश झाला त्यांचा पार्थिव देह तेथून मुंडगावला आणण्यात आला. व गावाबाहेरील स्वतःच्या शेतात त्यांची समाधी बांधण्यात आली. परंतु( खरे समाधी स्थळ पानेट क्षेत्रालाचलाभले)नंतर काही वर्षांनी पुंडलिक बुवांची समाधी त्यांच्या इच्छेनुसार बायजाबाईंच्या समाधी शेजारीच बांधण्यात आली. प्रत्येक भक्ताने महाराजांच्या या थोर शिष्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन स्वतःला धन्य करून घ्यावे. पूर्णा नदीचा उल्लेख गरुड पुराणात पयोष्णी असा केला आहे. तिचे थोर महात्म्य मुक्तकंठाने गायलेले आहे. श्री गजानन महाराजांनी पूर्णा नदीत अनेक वेळा स्नान केले. पानेट येथे ब्रम्हचारी महाराजांना भेटायला गेल्याचे उल्लेख सापडतात. पुराण काळात या पुर्णेकाठी अनेक ऋषीं मुनींनी तपश्चर्या केली त्यांची आश्रम होती, असा उल्लेख ठीक ठिकाणी दिसतो. अशा या पयोष्णी नदीमध्ये आंघोळ व पूजा करून संत बायजाबाईंनी आपला देह विसर्जित करावा. यामध्ये काहीतरी रहस्य आहे, असे वारंवार वाटते व ते बुद्धिस पटतेही. मुंडगावात संत बायजाबाई चे मंदिर आहे मंदिरात एका चित्रकाराने आपल्या कल्पनेच्या कुंचल्याने बायजाबाईंचे चित्र साकारले ते लावले आहे, त्यावरुन बायजाबाईंच्या तेजस्वी व्यक्तीमत्वाची कल्पना येते. .व एक छोटी सुंदर मुर्ती आहे. येथे नियमित पूजा पाठ व पुण्यतिथी निमित्त भव्य यात्रा महोत्सव महाप्रसाद साजरा करण्यात येतो
लोक निंदेच्या अग्नी दिव्यातून पार पडलेल्या बायजाबाईंचे श्रद्धेने पुण्यस्मरण होते तिर्थक्षेत्र पानेट आणि मुंडगाव यांच्या पुरातन संबंध ला उजाळा दिला तो पानेट संस्थान चे विश्वस्त श्री मनिष पाटील मोडक यांनी यांना श्री संत बायजाबाई बद्दल महिती दिली व ची. विराट ढोरे च्या विनंती ने त्यांनी पानेट ला समाधी स्थळ बांधले व दर वर्षी आम्ही सदस्य मंडळ तिथे जावून अभिषेक करतो यावर्षी 18/01/2026 रविवारी हा उपक्रम होणार आहे तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा
श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव व ढोरे परिवारातर्फे संत बायजाबाई यांना शत् शत् प्रणाम