
अकोट प्रतिनिधी :- प्रभाकर बोरकर :-देवरी
विदर्भातील प्रसिद्ध श्री पंचमुखी महादेव संस्थान येथे श्री संत तुकाराम महाराज सामूहिक गाथा पारायण व अखंड हरिनाम सप्ताह दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा साजरा करण्यात आला.
५९ वर्षापूर्वी श्री संत शिवराम महाराज पवार आणि संत पांडुरंग महाराज पाटकर यांनी सुरू केलेला शिवराम महाराज हरिनाम सप्ताह देवरी गावातील नागरिकांनी अखंड सुरू ठेवला आहे.
तेव्हाची परिस्थिती ही फार वेगळी होती तरी नागरिकांनी पारायण अखंड सुरू ठेवले. आज एका लहानशा रोपट्याच विशाल रोपट्यात रूपांतर गावकऱ्यांच्या आणि पंचक्रोशीतील भाविकांच्या सहकार्याने वाढतच आहे.
सालाबाद प्रमाणे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तन सेवा सप्ताहामध्ये लाभते. देवरीच नाही तर पंचक्रोशी मधून भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने कीर्तन श्रवनासाठी उपस्थित असतात.
कीर्तनामध्ये पंचक्रोशीतील टाळकरी मंडळी आपली सेवा देतात.
या गाथा पारायण सोहळ्यास ह भ प श्री सुरेशजी जोशी महाराज मार्गदर्शन लाभते. त्याचप्रमाणे या भव्यदिव्य कार्यक्रमाचे व्यासपीठ नेतृत्व ह भ प शिवाजी महाराज अमृतकर यांच्या देखरेखीत गाथा पारायण वाचन संपन्न होते.
ह भ प श्री एकनाथ महाराज पवार यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमात असते. या वर्षी सप्ताहामधे विदर्भाच्या कानाकोपऱ्यामध्ये गाजलेले कीर्तनकार हभप श्री आत्माराम महाराज वाकोडे नैराट ,ह भ प ज्ञानेश्वर महाराज पातोंड वरुड, श्री संजय महाराज ठाकरे, कौंडण्यपूर , हभप श्री गोपाळरावजी महाराज उरळकर, श्री अरुण महाराज लांडे पारस, श्री भानुदास महाराज वरखेडे टाकळी , यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.
हभप श्री वासुदेव महाराज खोले यांचे काल्याचे किर्तन संपन्न झाले सोहळ्यामध्ये गायनाचार्य तसेच उत्कृष्ट मृदुंगचार्य श्री महादेवराव आळंदीकर , श्री दिगंबर महाराज गावंडे, तसेच पंचक्रोशी मधील टाळकरी मंडळी या कीर्तन सोहळ्याला आपली सेवा अर्पण करतात.
दि १४ जानेवारी रोजी गावातून भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले . सर्व पाहुण्यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला .
सात दिवसाच्या सोहळ्यामध्ये देवरी गावाला एक यात्रेचे स्वरूप आले होते.
गावात भक्तिमय वातावरण झाले होते. ही अखंड परंपरा गावकरी मंडळी आजही निष्ठेने जपतात.