
तेल्हारा प्रतिनिधी :-विलास बेलाङकर)- नागरिकांच्या समस्यांशी निगडित असलेले संबंधित सर्व कर्मचाऱ्यांचे पालिके मधील कक्ष वरच्या मजल्यावर घेण्यात आल्यामुळे ज्येष्ठ व अपंग नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी संबंधित कर्मचाऱ्यांचे कक्ष तळमजल्यावर घेण्यात यावे याकरिता विरोधी गटातील गटनेत्यांसह पाच नगरसेवकांनी तेल्हारा पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.
नगर परिषद कार्यालयात बरेच कर्मचार्याचे कक्ष हे वरच्या मजल्या वर करण्यात आले आहे नगर परिषद कर्यालयात शहरातील नागरिकांना कोणत्या ना कोणत्या कामा निमित्य नगर परिषद कार्यालयात यावे लागते संबंधित विभागाचे जे कर्मचारी कक्ष वरच्या मजल्या वर करण्यात आले आहे त्यांचे कक्षात जाण्या साठी चढणे व उतरणे करिता जेष्ठ नागरिक,अपंग नागरिक व पायाचे दुखणे असलेल्या नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे हि बाब स्थानिक स्वराज संस्था म्हणुन निच्छितच योग्य वाटत नाही म्हणुन नगर परिषद,तेल्हारा कार्यालयाचे सर्व कर्मचाऱ्याचे कक्ष हे तळ मजल्यावर पूर्वी प्रमाणे करण्यात यावे या बाबत शहरातील प्रतीष्ठित नागरिक तथा माझी नगर सेवक हुकूमचंद शर्मा यांच्यासह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिकांची मागणी असून त्यांची हि मागणी रास्त असुन या बाबत आपण नागरिकांच्या समस्या बाबत निगळीत असलेले कर्मचाऱ्यांचे कक्ष तातळीने तळ मजल्या वर घेण्यात यावे अशी मागणी पालिका गट नेत्या कान्होपात्रा रामभाऊ फाटकर नगरसेवक कैलास नारायणराव ठोकणे , राजेश रमेशराव खारोडे ,पंचफुला श्रीकृष्ण कवर ,रीना मुकेश आसरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.