
अकोट प्रतिनिधी:- प्रभाकर बोरकर :सालाबाद प्रमाणे 11 जानेवारी रोजी प्रत्येक वर्षाला कॉन्व्हेंट मध्ये वार्षिक संमेलन खूप मोठ्या उत्साहामध्ये संपन्नझाले. सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात श्री सरस्वती वंदनहे गीत गीत गाऊन विद्यार्थ्यांनी सरस्वतीच्या पूजनाचा व याच गाण्यावर बहारदार नृत्य सुद्धा सादर करण्यात आले. तेव्हा शालेय परिसर अक्षरशः दणाणून गेला.कॉन्व्हेंट मधे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा यामध्ये प्राविण्यता पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे त्यांना मेडल व ट्रॉफी देऊन त्याचा गौरव करण्यात आला. तसेच शालेय सत्रामध्ये विद्यार्थ्यांकडून अनेक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील चालू वर्षाकरिता ज्यांनी अभ्यासामध्ये चांगली प्रगती केली त्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवरी गावचे न्यायालयीन व्यवस्थेमधील मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीशश्री.सुभाष पाटील फोक मारे त्यांनी विद्यार्थ्यांचे बालपण हे कशा पद्धतीचे राहते व त्याला कशा पद्धतीने संस्कांर स्वरूप बनविण्यात येते हे कॉन्व्हेंट अंगणवाडी हे घडू शकते तेव्हापासून विद्यार्थ्यांना विद्यार्थी जीवनाची परिभाषा कळते या महत्त्वपूर्ण विषयांमध्ये देवरीयेथील सुभाष पाटील फोक मारे मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी लहान मुलांना व शिक्षक कर्मचारी वर्गाला महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. त्यानंतर संस्थेचे सचिव प्रमोदराव चोपडे यांनी सुद्धा संस्थेच्या व विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्या करता स्वामी विवेकानंद हे आवश्यक त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याकरता कटिबद्ध आहे .असे सुतोवाचन केले या कार्यक्रमाचं सरस्वती पूजन संस्थापक संचालिका श्रीमती प्रभाती चोपडे संस्थेच्या अध्यक्षासौ. भारतीताई चोपडे सचिव डॉक्टर प्रमोद राव चोपडे नागास्वामी इंग्लिश स्कूल गायकवाड सर देवरी गावच्या सरपंच सौ वर्षात गायकवाड जिल्हा परिषद पाटसुल शाळा केंद्रप्रमुख भुरे सर तसेच देवरी आलेवाडी पाटसुल पिंपरी डिक्करदिनोडा मरोडा पंचक्रोशी मधील पालक वर्ग प्रामुख्याने हजर होता.स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंटच्याप्राचार्य सौ. शुभांगी ताई बंड व स्वामी विवेकानंद कॉन्व्हेंट चे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सालाबाद प्रमाणे पार पडणाऱ्या वार्षिक संमेलनाला विद्यार्थ्यांकडून महत्वपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमाचा उत्कृष्ट कार्यक्रम घडवून आणला त्यामुळे संस्थेचे सचिव यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले
दिपप्रज्वलन करून आणि माता सरस्वती, राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. व्यासपीठावर आमच्या संस्थेच्या संस्थापक संचालिका श्रीमती प्रभाताई चोपडे, संस्थेचा अध्यक्षा सौ भारती चोपडे, सचिव डॉ. प्रमोद चोपडे, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधिश श्री सुभाष फोकमारे ,नागस्वामी इंग्लिश स्कूल बोर्डीचे श्री गायकवाड सर, देवरीचे सरपंच सौ गायकवाड, पाटसूळ येथील जिल्हा परिषद चे केंद्रप्रमुख श्री भुरे सर आणि आपल्या शाळेच्या प्राचार्य सौ शुभांगी बंड ह्या होत्या
सर्वमान्यवरांच्या हस्ते मागील आठवड्याल घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मध्ये प्राविण्य पटकावणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी अनेक मनोरंजक आणि संस्कृतिक कार्यक्रम पार पाडले, श्री सरस्वती वंदना या सुरेल गाण्यावर केलेलं बहारदार नृत्य हे ह्या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरले
अनेक पालकवर्ग आणि त्याचे नातेवाइकांचे उपस्थित हा कार्यक्रम पार पडला, देवरी परिसरातील सर्व गावातील नागरिकांनी हजेरी लावल्यामुळे शाळेचे पटांगण अगदी हाऊसफुल झाले होते
सर्व कार्यक्रम पार पाडण्यासाठी आमच्या शाळेचे सर्व शिक्षक आणि सर्व शिकक्षेतर कर्मचारी यांनी खुप मेहनत घेतली. संध्येच्या अध्यक्षा सौ भारती चोपडे यांच्या हस्ते या सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला