
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा करण्यात आला स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनाचे औचित साधून तेल्हारा येथे ओम शांती भवन मध्ये रोजी ह्या विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्राच्या संचालिका आदरणीय प्रमिलादीदी ह्या होत्या तर प्रमुख मार्गदर्शन म्हणून आदरणीय ब्रह्मकुमार विशाल भाई अकोला आदरणीय श्याम भाई आदरणीय उद्धवराव विखे सर कैलास बागडे नागपूर तर प्रमुख उपस्थितीत आदरणीय केदारजी कौलकर सर आदरणीय ज्योतीताई कौलकर मॅडम आदरणीय वैष्णवी दीदी ह्या होत्या कार्यक्रमाची सुरुवात परमपिता शिवबाबा यांचे नामस्मरण करून ध्यान धारणेने करण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे वैष्णवी दिदी यांनी तिलक लावून व गुलदस्ता देऊन स्वागत केले यानंतर शाम भाई यांनी सुरेल आवाजात स्वागत गीत म्हटले नंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली प्रमुख मार्गदर्शक विशाल भाई यांनी युवक युती यांना युथ फॉर हेल्दी लाइफस्टाईल, लाइफस्टाइल मेडिटेशन, पॉझिटिव्ह हॅबिट्स व युथ एम्पॉवरमेंट यासारख्या जीवन बदलविणाऱ्या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर उद्धवराव विखे सरांनी स्वामी विवेकानंद यांचे उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका, सेवा हाच धर्म असून त्यानुसार वाटचाल करण्याचे तसेच जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला तसेच नेहमी सकारात्मक विचार करून ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले कैलास बागडे यांनी सुद्धा उपस्थित युवक युवतींना मार्गदर्शन केले आदरणीय कौलकर सर यांनी मार्गदर्शन करताना युवकांनी सकारात्मक सवयी अंगीकारून स्वतःचे, समाजाचे व राष्ट्राचे भविष्य उज्वल करावे असे आवाहन केले तर सौ कौलकर मॅडम यांनी आरोग्यदायी जीवनशैली ही केवळ गरज नाही तर ती आपली जबाबदारी असल्याचे सांगितले त्यानंतर मेडिटेशन ध्यानधारणा कशी करावी याबद्दल आदरणीय प्रमिलादीदी यांनी सविस्तर मार्गदर्शन करून युवक युतींनी दररोज सकाळी ध्यानधारणा, मेडिटेशन केल्यास त्यांनी केलेला अभ्यास लक्षात राहण्यास मदत होईल असे सांगून मेडिटेशन करण्याचे आवाहन केले व मेडिटेशन कसे करावे याचे प्रात्यक्षिक सुद्धा त्यांनी सादर केले सदर कार्यक्रमास 75 ते 80 युवक युवती उपस्थित होत्या उपस्थित मान्यवरांना ईश्वरीय सौगात व टोली म्हणजेच प्रसाद तसेच युवक व युवतींना सुध्दा टोली म्हणजेच प्रसाद देऊन कार्यक्रमाचा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैष्णवी दिदी, मनीष भाई, सतिषभाई धरमकार तसेच केंद्रातील भाऊ बहिणी यांनी परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन व आभारप्रदर्शन गोपाल भुजबले सर यांनी केले अशा रितीने स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिन ओम शांती भवन तेल्हारा येथे उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला