
अकोट प्रतिनिधी:- प्रभाकर बोरकर.
महाराष्ट्रामध्ये क दर्जा प्राप्त असलेल्या वेताळबाबा संस्थान अकोट अकोला रोड देवरी फाटा या ठिकाणी सालाबाद प्रमाणे पौष महिन्यामध्ये या यात्रेला सुरुवात होते ही यात्रा सालाबादप्रमाणे चार आठवडे अतिशय उत्साहामध्ये पार पडते आज 41 वर्षाची परंपरा सुरेश जोशी महाराज देवरीकर यांचा जाहीर भागवताचा कार्यक्रम सुद्धा राहतो.दि. 7 जानेवारी रोजी भागवताच्या समाप्तीवर भव्य दिव्य वेताळबाबा संस्थांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये परिसरातील हजारो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला
येणारा रविवार हा वेताळबाबा यात्रेचा शेवटचा रविवार म्हणून यात्रा भरेल त्यामुळे विदर्भातून या चौथ्या रविवारी वेताळ बाबाचे अनेक भाविक भक्त प्रामुख्याने या यात्रेला हजेरी लावतात