
तेल्हारा प्रतिनिधी :-
तेल्हारा शहरातील अनेक वर्षांपासून मुख्य चौकात सुलफ
शौचालय उभरण्यासाठी
मागणी असुन दुर्लक्षित असलेल्या समस्ये बाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शहरातील सौ शिवानी साचीन थाटे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
तेल्हारा शहरामधील मागील अनेक वर्षा पासून शहराच्या टॉवर चौक ते जगत गुरु संत तुकाराम महाराज चौक या मार्केट परिसरात सुलफ शौचालय नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे . या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिक,दुकानदार ,महिलांना एकही सुलफ शौचालय उपलब्ध नसल्याने व पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याने नागरिक नगर परिषदच्या परिसरातच पर्याय म्हणुन नाईलाजास्तव वापर करत आहे ही बाब सर्वश्रुत आहे . मोठया प्रमाणावर नागरिकांची येजा असणाऱ्या मार्केट परिसरामध्ये एक सुलफ शौचालय असणे अत्यावश्यक आहे याबाबत आधी सुद्धा अनेक वेळा निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे. या महिलांना तर अक्षरशः मोठा त्रास सहन करावा लागतो .ही बाब अत्यंत संवेदनशील आहे
त्यामुळे आपल्या नगरपरिषदच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाला आहे . एकीकडे 3 दिवसातच नगर पालिकेत नगरध्यक्षा यांच्या दालणासाठी नवीन सुसज्ज सर्व सोईयुक्त प्रसाधन गृह उभारले जाऊ शकते मग तेवढी कार्य तप्परत सर्व सामान्य नागरिकांच्या मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या समस्से कडे का दाखवली जात नाही .तरी आपण या निवेदनाची दखल घेऊन 30 दिवसाच्या आत तेल्हारा शहरातील मार्केट परिसरात सुलफ शौचालय उभरण्यासाठी पुढाकार घेण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल या स्वरूपाचे निवेदन सादर करण्यात आले आहे.