
अडगांव बु प्रतिनिधी दिपक रेळे
अडगांव बु ॥ ता तेल्हारा येथिल जिल्हा परिषद विद्यालयाच्या २००० च्या दहावी बॅचचे माजी विद्यार्थी आणि शिक्षक यांचे स्नेहसंमेलन २००० वर्षानंतर जिल्हा परिषद विद्यालयातील स्थानिक हॉलमध्ये अतिशय मोठ्या उत्साहात पार पडले . या भावनिक भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला कार्यक्रमाला 70 ते 80 विद्यार्थी – I विधार्थानी तसेच शिक्षक – शिक्षीका यांची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे विशेष आकर्षण ठरले . कार्यक्रमांच्या अध्यस्थानी विद्यालयाचे प्राचार्य श्री चारूदत्त मेहरे सर होते स्नेहसंमेलन कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते या दहावीच्या वर्गमित्राचे स्नेहमिलन यांच्या अथांग इच्छा शक्तीमुळे हा योग जुळून आला त्याच बरोबर विध्यार्थाचे झालेले हे मिलन अत्यंत भावूक व आनंददायी ठरले . कार्यक्रमाची सुरुवात स्वरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले नंतर प्रत्येक विध्यार्थी यांनी आपआपल्या कुटुंबाचा परिचय करून दिला तसेच एकमेकांच्या सद्यस्थिती ची माहिती दिली तसेच यावेळी दिवंगत काही माजी वर्ग मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्याच बरोबर त्यांच्या वारसांना मदत म्हनुन प्रत्येकांच्या वारसांना 5000 हजार रुपये रोख न देता त्याच्या नावाने बॅक मध्ये फिक्स डिपावजिट करून दिली कार्यक्रमांच्या यशस्वी होण्यासाठी प्रकाश पटके ‘ विनोद राखोंडे , नितीन निमकर्डे ‘ प्रविण अढाऊ श्रीकांत बावस्कार जगदीप पांडव प्रकाश रेळे प्रशांत बावस्कार दिपक जळमकार सतीष नेरकर प्रफुल्ल देशमुख आदीसह माजी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थी नी अथक परिश्रम घेतले