
प्रभाकर बोरकर :-अकोट प्रतिनिधी
थोर महापुरुषांच्या जयंती न साजरी करणाऱ्या मुजोर अधिकाऱ्यांनवर
कारवाई कधी करणार.? किंवा शासनाचा आदेश देव्हाऱ्यामध्ये जोपासूनचठेवणार?
भारतातील पहिली शिक्षिका सावित्रीबाईंनी महिलांच्या करता शाळा उघडल्या शिक्षणाचेदरवाजे त्यांनी खुला केले. परंतु शोकांतिका ती एक स्त्री असल्यावरही उमरा फिरते पथक च्या स्त्री अधिकारी व कर्मचारी
क्रांतीज्योती तेजोमयसावित्रीबाई फुले यांची जयंतीसाजरी करू शकत नाहीत ही एक महिलांकरता निंदनीय बाब आहे. मुंडगाव पी एस सी अंतर्गत उमरा गावामध्ये आरोग्य फिरते पथक व मुंडगाव अंतर्गत उप प्राथमिक आरोग्य केंद्र उमरा आहे. वस्तुस्थिती पाहता कर्मचारी अधिकारी हे थोर महापुरुषांचिजयंती साजरी करण्यास नकार दर्शवितात. त्यामुळे अशा कामचुकार अधिकाऱ्यांच्या नाकारतेपणामुळे शासनाला परिपत्रक काढावे लागले. की ज्यांच्या भरोशावर तुम्ही खाता पिता त्या महापुरुषांची आपण जयंती साजरी करत नाही?त्याकरता शासन निर्णय निर्गमित झाला आहे एवढा आजचा अधिकारी वर्ग हा बेशिस्तझाला आहे.. कारण त्याला शासनाचा कोणताही धाक उरला नाही शासनाला सावित्रीबाई यांच्या जयंतीला उपस्थित नसले तरी चालेल ?पण पगार घ्या व तालुका वैद्यकीय अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी या अधिकाऱ्याचा वचक बोचरा झाला आहे.(कारण तुम्ही तसे आम्ही )या मुळे हे घृणस्पद प्रकार घडत असल्याचा प्रभाव असल्याचे जानवते.तेव्हा अशा कामचुकार व घमेडी नैतिकतां.न जपणाऱ्या अधिकारी यांची मस्ती जिरवायला हवी तरच महापुरुषाची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाईल . ज्या आरोग्य केंद्रामध्ये पाच ते सात कर्मचारी आहेत त्यापैकी केवळ एकच महिला कर्मचाऱ्याने सावित्रीबाई फुले
यांची जयंती प्राथमिक आरोग्य उपकेंद्रा च्या सौ ढोणे ताई व आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी खूप चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली..
मला जिल्हा परिषदेला महत्त्वाचे काम असल्यामुळे मी हजर राहू शकली नाही. मला आपण कोण विचारणार? व का विचारणार! मला च का विचारता.. एक जबाबदार आरोग्य अधिकाऱ्याचे हे वाक्य?
शारदा भिरडे
आरोग्य अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव..
आमच्या गावामध्ये कोणते फिरते पथक कोणताही अधिकारी सेवा देत नाहीकिंवा गावात कधीच येत आले तर अमावस्या पौर्णिमा प्रमाणेच येतात.. त्यामुळे सामान्य जनतेचे खूप मोठे नुकसान आहे
उपसरपंच/प्रभारी सरपंच श्री गणेश नाठे ग्रामपंचायत उमरा
.. प्रशांत खेडकर
तंटामुक्ती अध्यक्ष उमरा तालुका अकोट