
शेगांव शहरामध्ये पहिली AMK नॅशनल लेव्हल अबॅकस स्पर्धा संपन्न
शेगाव प्रतिनिधी :-
शेगांव येथे राष्ट्रीय स्तरीय अबॅकस परीक्षा व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
सौ. आरती महेश खोट्टे व डॉ. महेश खोट्टे यांच्या AMK अबॅकस कंपनी द्वारे घेण्यात आलेल्या स्पर्धेत राज्यभरातून ३०० विद्यार्थी सहभागी झाले होते.या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या लेव्हल मध्ये सहभागी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस म्हणून ट्रॉफी व सायकल चे वाटप करण्यात आले.आपल्या भागातील इयत्ता तिसरी मधील विद्यार्थी कु.स्वराली दीपक हागे रा.वानखेड ह्या मुलीने पहिला क्रमांक पटकावत सायकल जिंकली.सर्व मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी डॉ. सौ. अपर्णाताई संजयजी कुटे, तर मा. श्री. अनिल गावंडे (प्रदेश उपाध्यक्ष भा. ज. पा.),मा. श्री. राजेश अग्रवाल, डॉ. मोहन बानोले,श्री. संजयजी देशमुख,श्री. प्रवीण हेंड,डॉ. प्रकाश बगाडे, डॉ. अजिज पटेल,श्री. प्रशांत देशमुख,श्री. हरिदास सरोदे यांची उपस्थिती लाभली.
खेडे गावातील मुलांमध्ये शिक्षणाची आवड व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अबॅकस चा उपयोग होत असून शेगांव शहरामध्ये ही परीक्षा होणे ही गौरवाची बाब आहे.