
दानापुर.प्रतिनिधी.नंदकिशोर नागपुरे
अ.भा.श्री गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज मोझरी अंतर्गत श्री गुरुदेव सेवा मंडळ शाखा दानापूर वतीने ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त दानापूर येथील वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज अस्थीस्मारक मंदिर येथे सायंकाळी सात वाजता पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात आला सर्व प्रथम बाळशास्त्री जांभेकर व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी गुरुदेव सेवा मंडळाचे जेष्ठ सेवक श्री श्रीकृष्ण भगत हे होते यावेळी पत्रकार बांधवांचा शाल श्रीफळ व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रार्थना पुस्तीका देऊन श्री माणिकराव इंगळे गुरुजी, तालुका सेवाधिकारी अँड अजित सेंगर, जेष्ठ उपासक माणीकराव वाघमारे वसंतराव टाले रामचंद्र वाघमारे गोपाल दादा झुने बाळूभाऊ बावणे संतोष वाघमारे बाळू घायल अभिजित इंगळे यांनी पत्रकार भगवान हागे, महादेव वानखडे, सुनील धुरडे, नंदकिशोर नागपूरे यांचा शाल श्रीफळ देऊन व जेष्ठ पत्रकार प्रमोद हागे, संजय हागे, सखाराम नटकुट शेख राजू,रविंद्र ढाकरे, योगेश अटराळे,गोपाल विरघट पत्रकार बांधवाचा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज प्रार्थना पुस्तिका भेट देऊन सत्कार स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंगळे गुरुजी व आभार अँड अजित सेंगर यांनी केले या वेळी राष्ट्रवंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.यावेळी श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक, श्री गुरुदेव बाल भजन मंडळाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.