
तेल्हारा ता.प्रतिनिधी..नंदकिशोर नागपुरे
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्व.सहदेवराव उपाख्य दादासाहेब भोपळे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने व्दिसत्रात तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन सहदेवराव भोपळे विद्यालयात करण्यात आले होते. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले तसेच महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक स्व.दादासाहेब भोपळे व मार्गदर्शिका स्व.कमलिनीताई भोपळे यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पन करण्यात आले. या वक्तृत्व स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रम महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या अध्यक्षतेत पार पडला. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे यांनी स्पर्धेचा उद्देश प्रतिपादन केला. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतून एकूण ८४ स्पर्धक त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांसह सहभागी झाले होते. या स्पर्धेत गट अ (वर्ग ६ ते ८)मध्ये मा जिजाऊ ते आई सावित्री जागर स्त्री शक्तीचा, पर्यावरण संरक्षण – काळाची गरज, मोबाईल हटवा, बालपण वाचवा, जय जवान जय किसान @६० वर्ष, दैनदिन जीवनातील विज्ञान तसेच गट ब (वर्ग ९ ते १२) मधून आर्टिफिशियल इंटेलिजन्सी (एआय) तारक की मारक, आपले संविधान, आपला अभिमान, उठा,जागे व्हा आणि ध्येयप्राप्तीपर्यंत थांबू नका- स्वामी विवेकानंद, शिक्षणाचे माध्यम मराठी, हिंदी की इंग्रजी या विषयावर पैकी कोणत्याही एका विषयावर विद्यार्थी स्पर्धकांना प्रभावी विचार व्यक्त करण्याची संधी होती. स्पर्धकांचा प्रतिसाद व चुरस वाखाणण्याजोगी होती. समारोपीय व बक्षीस वितरण कार्यक्रम संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांच्या अध्यक्षतेत आयोजित करण्यात आला होता. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, संस्थेच्या जेष्ठ संचालिका अन्नपूर्णाबाई बंड, आजीवन सदस्या सुनंदा भोपळे, संचालिका साधना भोपळे, स्पर्धेचे परीक्षक स्व.राजीव गांधी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनिता गिऱ्हे, जि.प.प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डॉ.गणेश इंगळे, जि.प.प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला राऊत, जि.प.माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चारुदत्त मेहेरे,प्रा.विलास राऊत, माजी शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर बोचरे, तालुका विज्ञान संघाचे अध्यक्ष विलास घुंगड, नवयुग विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण टाले यांची प्रमुख उपस्थिती होती. या समारोपीय कार्यक्रमाचे प्रास्ताविकात संस्थेचे संचालक प्रा.कौस्तुभ भोपळे यांनी स्पर्धेच्या विषयावर प्रभाव टाकून विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक ज्ञानासोबतच त्यांच्या वक्तृत्व शैलीचा विकास वाढविण्याचा आयोजकांचा उद्धेश असून यासाठी योग्य नियोजन दरवर्षी करण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धेत अ गटातून भोपळे विद्यालयातील श्रमिका जयप्रकाश मोरखडे हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच दुसरा क्रमांक तेल्हारा येथील गुरुगुल ज्ञानपीठची स्वरा निळकंठ घाटोळ व हनुमानप्रसाद साह जनता विद्यालय,दानापूर येथील पंखुडी धनश्याम फाफट ह्यांनी तर तृतीय क्रमांक सेंट पॉल अकॅडेमी, हिवरखेडची गार्गी शंकर दुनघव व सरस्वती इंग्लिश स्कूल,हिवरखेडची ईश्वरी प्रभुदास म्हसाये हिने तिसरा क्रमांक पटकावला. तर उत्तेजनार्थ बक्षीस नवयुग विद्यालय वाडी अदमपूरची रोशनी दिनेश डीघोळे हिला प्रदान करण्यात आले. ब गटात हिवरखेड येथील जि.प.महात्मा गांधी विद्यालयाची भावना धनराज बोदळे हिचा प्रथम, नवयुग विद्यालय वाडी अदमपूरची गौरी गोपाल धांडे व हनिफिया उर्दू हायस्कूल हिवरखेड येथील कमरान अली वासिम अली ह्याने दुसरा तर हनुमान प्रसाद साह जनता विद्यालय, दानापुरची कृतिका कैलास मिसाळ हिने तिसरा क्रमांक मिळविला. स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तेल्हारा येथील सृष्टी प्रफुल्ल इंगळे हिला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले.यावेळी परीक्षकांनी सुद्धा स्पर्धकांवर बक्षिसाचा वर्षाव केला. या स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षातील सहकमल करंडक दानापूर येथील हनुमान प्रसाद साह जनता विद्यालयाने पटकावला. यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.या समारोहाचे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या वतीने सहदेवराव भोपळे विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोषकुमार राऊत यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यस्तरीय शिक्षक गुणगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल गौरविण्यात आले.तसेच सहदेवराव भोपळे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक डॉ.मयूर लहाने यांची शिक्षकांच्या विभागीय स्पर्धेत शोध निबंध या स्पर्धेत राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल त्यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला.या समारोहाचे संचलन डॉ.शंकर दुनघव व डॉ.मयूर लहाने यांनी केले. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोषकुमार राऊत व श्रीमती रतनबाई ताराचंदजी कानुंगा विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र सोळंके,भोपळे विद्यालयाचे पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांच्या मार्गदर्शनात समस्त शिक्षक,शिक्षिका व कर्मचारी वृंद यांनी सहकार्य केले. या समारोहाचे आभार प्रदर्शन शाळेचे पर्यवेक्षक गणेश खानझोडे यांनी केले.