
सचिन महाजन:- हिंगणघाट प्रतिनिधी
बोरखेडी वडनेर केळापूर प्रोजेक्ट नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट च्या वतीने 37 व्या सडक सुरक्षा महिना मध्ये आज नॅशनल हायवे 44 वर चालणाऱ्या रोड युजर जे व्यक्ती रोड नी दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट चा वापर करतात व चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट वापरतात अश्या रोड युजर चे दारोडा टोल प्लाझा येथे थांबवून त्यांचे पुन्हा मनोबल वाढवण्याकरिता त्यांचे फुल देत स्वागत केले व त्यांना नियमित पुन्हा हेल्मेट व सीट बेल्ट करिता प्रोत्साहित केले,या कार्यक्रमाला दारोडा टोल प्लाझा चे वरिष्ठ अधिकारी सेफ्टी मॅनेजर पंकज हिंगे , कॉरिडोर मॅनेजर भानुप्रताप सिंग,प्लाझा मॅनेजर मालकीत सिंग, एच आर मॅनेजर राजपाल सिंग,अकाउंट मॅनेजर अमित दास अशा या मान्यवरांनी सहभाग नोंदविला व एक्सिडेंट मध्ये होणारी जिवीत हानी रोखण्याकरीता हेल्मेट व सीट बेल्ट ची जनजागृती करिता नियमित कार्यक्रम घेण्यात येत आहे..