
तेल्हारा ता.प्रतिनिधी
नंदकिशोर नागपुरे
हिवरखेड येथील आकांक्षा कॉलेज ऑफ पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हिवरखेड (11145) हे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र असून त्या ठिकाणी स्वयंसहायता समूह शिक्षणक्रम व बाल संगोपन आणि रंजन शिक्षणक्रम असे अभ्यासक्रम चालवले जातात. वीर बाल दिवसाचे निमित्त साधून पुनर्वसित आदिवासी परिक्षेत्रात दोन्ही अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा (आमोना) कासोद या ठिकाणी अभ्यास दौरा संपन्न झाला.
या अभ्यास दौऱ्यात अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी पुनर्वसित पालकांच्या भेटी घेतल्या तेथील माता पालक व बालकांना समुपदेशन केले. त्यांची माहिती गोळा केली व त्यांना वन्य प्राण्यांपासून कशा पद्धतीने शूरतेने लढावे लागते यासंदर्भात माहिती सुद्धा घेतली. त्यांच्यामध्ये असलेल्या कौशल्यांचा परिपूर्ण अभ्यास या सर्व विद्यार्थ्यांनी केला बालकांचा परिपूर्ण अभ्यास (केस स्टडी) या अभ्यासक्रमात असल्याने संपूर्ण विद्यार्थ्यांना या अभ्यास दौऱ्याची खूप मदत झाली व त्यामध्ये प्रत्येकाने सक्रिय सहभाग घेतला सोबतच विद्यार्थ्यांनी वीर बाल दिवसाच्या निमित्ताने अमोना या परिसरात प्रभात फेरी काढली आणि घोषणा देऊन बालकांचे व पालकांचे मनोबल वाढविले या अभ्यास दौऱ्याचे यशस्वी आयोजन अभ्यासकेंद्राचे केंद्र संयोजक प्रा. वैष्णवी मयूर लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास दौऱ्याचे समन्वयक प्रा. जयश्री ठाकरे यांनी केले विद्यार्थ्यांनी त्या परिसरातील सर्व बालक, पालक, तसेच माता पालकांच्या सुद्धा भेटी घेऊन त्यांना समुपदेशन केले. काही ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव सुद्धा घेतला हा अभ्यास दौरा फारच फलदायी व उपयुक्त ठरला. या अभ्यास दौऱ्यासाठी राधा रहाटे, वृषाली मसाळ, राधा ठाकरे, प्रतीक्षा बंड, शारदा चव्हाण, माधुरी काळे, अरुणा बेदुरकार, ममता ठवकर, गुंजन अग्रवाल, अनुश्री सेवक यांनी पुढाकार घेऊन हा अभ्यास दौरा यशस्वी संपन्न केला.