
तेल्हारा प्रतिनिधी :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार, तेल्हारा ग्रामीण ब्लॉक काँग्रेस सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी नंदकिशोर नागपुरे यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.
पक्षाची सोशल मीडियावरील उपस्थिती अधिक भक्कम करणे, काँग्रेसच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण स्तरावर पोहोचवणे आणि डिजिटल माध्यमातून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, ही महत्त्वाची जबाबदारी आता नंदकिशोर नागपुरे यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
नंदकिशोर नागपुरे यांच्या निवडीबद्दल काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. नागपुरे यांच्या नियुक्तीमुळे तेल्हारा ग्रामीण भागातील काँग्रेसची सोशल मीडिया यंत्रणा अधिक गतिमान होईल आणि पक्षाची ध्येयधोरणे व विकासकामे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
नंदकिशोर नागपुरे यांनी या निवडीबद्दल मा. प्रांताध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि अॅड.महेशदादा गणगणे महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी,अकोला जिल्हा अध्यक्ष श्री.अशोकजी अमानकर,तेल्हारा ता.अध्यक्ष श्री.गजानन वानखडे, पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाचे आभार मानले असून, आगामी काळात पक्ष संघटना डिजिटल माध्यमातून अधिक सक्षम करण्यासाठी आपण पूर्ण निष्ठेने आणि सक्रियपणे काम करणार असल्याचे सांगितले आहे.