
तेल्हारा ता.प्रतिनिधी.नंदकिशोर नागपुरे
महात्मा फुले शिक्षण संस्था, हिवरखेड अंतर्गत सहदेवराव भोपळे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे दिनांक १ मे २०२६, शुक्रवार रोजी महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शालेय अभ्यासिका उद्घाटन, विद्यार्थ्यांचा गौरव तसेच वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध उद्योजक नंदकिशोर शेगोकार यांच्या हस्ते राष्ट्रध्वज वंदन संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे होते. प्रास्ताविकात संस्थेचे कार्यवाह श्यामशील भोपळे यांनी महाराष्ट्र दिनाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी योग्य वातावरण मिळावे या उद्देशाने ‘गुरु-शिष्य अभ्यासिका’ उभारण्यात आल्याचे स्पष्ट केले.
या दिनाचे औचित्य साधून शाळेचा वार्षिक निकाल जाहीर करण्यात आला. तसेच शाळेच्या माजी प्राचार्या रजनी वालोकार (सदाफळे) यांच्या संकल्पनेतून यावर्षीचे ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून सार्थक आकोटे व प्राची व्यवहारे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.
निपुण महाराष्ट्र’ चाचणी यशस्वीपणे राबविल्याबद्दल शिक्षक प्रवीण सोनुने यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिलकुमार भोपळे यांच्या हस्ते कार्यवाह-सहकार्यवाह कक्षाचे उद्घाटन, तर नंदकिशोर शेगोकार यांच्या हस्ते शाळा परिसरातील ‘गुरु-शिष्य अभ्यासिका’चे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद भोपळे, ज्येष्ठ संचालिका अन्नपूर्णाबाई बंड, साधनाताई भोपळे, सहकार्यवाह स्नेहल भोपळे, संचालक प्रकाशचंद्र खोब्रागडे, शिवशंकर मार्के, प्रा. कौस्तुभ भोपळे,विनोद कडू आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शंकर दूनघव व डॉ. मयूर लहाने यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य संतोषकुमार राऊत, पर्यवेक्षक गणेश खानझोडे, ज्येष्ठ शिक्षक रंजीत राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षिका व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले.