
सतोष विनके : अकोट प्रतिनिधी
अकोटःशहरातील श्री.जी. कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमीने दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सेंट पॉल्स ज्युनिअर कॉलेज, अकोटचा दोन्ही विज्ञान शाखेचा निकाल १०० % लागला आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.ऋतुजा वासुदेव काळे (९०.३३%) द्वितीय क्रमांक अधिरथ निलेश ठाकरे .(८९.६७% ) तृतीय क्रमांक कु. कृष्णाली दिनेश कोकाटे (८६.५०%). हिने पटकवीला आहे.तसेच किशोर दयानंद सावंग (८३.५०% ) ,वंश पवन गुप्ता (८३.३३% ), कु. गौरी उमेश मेतकर (८३.३३%) अंश निलेश गणात्रा (८३.१७%), माज खान नासिर खान(८२.६७%), वंश मनीष हरकंठ (८१.३३%), कु. सृष्टी संदीप मंगळे (७९.६७%), श्रवण संजय बोडखे (७७.६७%) या विद्यार्थ्यांनी सुद्धा यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटिया सर, सचिव प्रमोद चांडक उपाध्यक्ष लुनकरण डागा प्राचार्य विजय बिहाडे उपप्राचार्या सौ. ममता श्रावगी व रिंकू अग्रवाल, शाळा व्यवस्थापक प्रभुदास नाथे नीलिमा देशमुख नितेश इलामे अभिजीत मेंढे, नितीन गावंडे तृप्ती चवरे सतीश ठोकळ, रोहिणी कोकाटे व सर्व शिक्षक वृंद यांना देतात.