
अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी-अनंत मते
दि.1 मे 2026 ला संकल्प व्यसनमुक्ती केंद्र कारला येथे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि हारार्पण करण्यात आले. यावेळी प्रामुख्याने संस्था सचिव श्री महादेव एम.भांबेरे, समुपदेशिका कु. श्रद्धा एस.बोरसे ,गजानन आर.खडसे ,प्रतीक एम.वानखडे विनोद ग. धुमाळे आदी मान्यवर हजर होते. यावेळी बोलताना मान्यवरांनी देश निर्माण साठी श्रमिकाचे श्रम किती महत्त्वाचे आहेत याचे महत्त्व विशद केले. देशाला बळकट करण्यासाठी
कार्यसंस्कृती प्रत्येक जनमानसात रुजली तर देश सशक्त आणि बलशाली होतो. म्हणून प्रत्येक भारतीयाने आळस न बाळगता आपल्या कुटुंबासाठी समाजासाठी किंबहुना आपल्या देशासाठी कार्य करत राहावे जेणेकरून प्रत्येकाचा सर्वांगीण विकास साधता येईल असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा बोरसे यांनी तर आभार प्रदर्शन प्रतीक वानखडे यांनी केले होते