!

नंदकिशोर नागपूरे तेल्हारा तालुका (प्रतिनिधी)
जिभेवर रेंगाळणारी चव आणि गरमागरम पदार्थ समोर असले की खवय्ये तिथे खेचले जातातच. अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील
सौदळा रोड, बस स्टॅन्ड परिसर सध्या अशाच एका स्वादिष्ट कारणामुळे चर्चेत आला आहे. निमित्त आहे,
संतोष हागे यांच्या हाताची चव असलेल्या ‘आलूबोंड्यांचे’!
चव अशी की मन भरेल, पण पोट नाही!
आजच्या धावपळीच्या युगात अस्सल घरगुती आणि मसालेदार चव मिळणे कठीण झाले आहे. मात्र, संतोष हागे यांनी आपल्या स्टॉलच्या माध्यमातून ग्राहकांना ती उणीव भासू दिली नाही. त्यांचे गरमागरम, खुसखुशीत आणि झणझणीत आलूबोंडे खाण्यासाठी केवळ स्थानिक नागरिकच नव्हे, तर बस स्टॅन्ड आणि आठवडी बाजारासाठी येणारे प्रवासीही मोठ्या उत्साहाने हजेरी लावत आहेत.
मेहनत आणि कुटुंबाची साथ
कोणत्याही व्यवसायाच्या यशामागे कष्टाची जोड असते. संतोष हागे यांना या कामात त्यांचे
वडील मोलाचे सहकार्य करतात. वडील-मुलाच्या या जोडीने चवीमध्ये सातत्य राखल्यामुळेच आज हा स्टॉल परिसरातील ‘लोकल फेव्हरेट’ म्हणून ओळखला जात आहे. शुद्धता आणि दर्जेदार साहित्य यामुळे येथील आलूबोंड्यांची चव ‘लय भारी’ असल्याचे प्रमाणपत्र खुद्द ग्राहकच देत आहेत.
ठळक वैशिष्ट्ये:
काय खास? गरमागरम आणि मसालेदार आलूबोंडा.
कुठे?*: बस स्टॅन्ड जवळ, सौदळा रोड, दानापूर.
ओळख: स्वच्छ सेवा आणि अस्सल चव.
“एकदा खाल तर पुन्हा नक्की याल, अशी या आलूबोंड्याची पसंती आता परीसरात पसरत आहे.”