
तेल्हारा ता. (प्रतिनिधी):नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील सिद्धार्थ नगरस्थित नालंदा बुद्ध विहारा’च्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून बुधवार, २९ एप्रिल २०२६ रोजी विहाराच्या वतीने भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त धम्म रॅली, मोफत आरोग्य तपासणी शिबीर, प्रबोधनपर व्याख्यान आणि सप्तखंजेरी कीर्तनाचा भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
कार्यक्रमाची पार्श्वभूमी आणि उद्देश
२९ एप्रिल १९७६ रोजी स्थापना झालेल्या या विहाराने ५० वर्षांचा यशस्वी टप्पा गाठला आहे. आजच्या काळात तरुण पिढीला व्यसनाधीनता आणि अंधश्रद्धेपासून दूर ठेवून, त्यांच्यावर बौद्ध धम्माचे संस्कार करणे व एक नीतिवान, सुसंस्कृत समाज घडवणे हा या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा मुख्य उद्देश आहे.
दिवसभरा ची रूपरेषा
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ६:०० वाजता ‘मंगलमैत्री धम्मरॅली’ने होईल. त्यानंतर सकाळी ८:०० वाजता धम्मध्वजा रोहण व सामूहिक बुद्धवंदना घेतली जाईल. भिक्खू संघाच्या उपस्थितीत सकाळी ९:०० वाजता धम्मदेसना होईल.
भव्य आरोग्य व रोगनिदान शिबीर:
सकाळी १०:०० ते दुपारी ३:०० या वेळेत सिद्धार्थ नगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्तदाब, अस्थिरोग, दंतरोग, हृदयरोग, नेत्र तपासणी व रक्तातील घटकांची तपासणी केली जाईल. तसेच रुग्णांना मोफत औषध सुविधा पुरविली जाणार आहे.
प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन
अध्यक्ष: सौ. सपनाताई धम्मपाल वाकोडे (सरपंच, ग्रा.पं. दानापूर)
उद्घाटक: डॉ. आयशा शबीह अब्दुल हमीद (वैद्यकीय अधिकारी, दानापूर)
प्रमुख व्याख्याते: मा. विश्वनाथ शेगावकर, IAS (Retd.) (माजी प्रधान सचिव, तामिळनाडू राज्य)
विषय: ‘सामाजिक, आर्थिक व धम्म विकासात बुद्ध विहारांची भूमिका’
प्रमुख पाहुणे: मा. मनोज ओहेकर (माजी डेप्टी कमिशनर, GST), मा. सुमेध धनबहादुर (तांत्रिक अधिकारी, अकोला), मा. किशोर तेलगोटे.
सायंकाळचे प्रबोधन
सायंकाळी ७:०० ते ११:०० या वेळेत प्रख्यात प्रबोधनकार आणि सप्तखंजेरी वादक डॉ. रामपाल महाराज धारकर (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार वारसदार सत्यपाल महाराज व संदीपपाल महाराज यांचे शिष्य) यांचे कीर्तन होईल.
तज्ज्ञ डॉक्टरांची चमू
या शिबिरात डॉ. सृष्टी लोणीकर (नेत्ररोग), डॉ. अभिजीत सिरसाट (अस्थिरोग), डॉ. निखिल कळासरे (हृदयरोग), डॉ. सत्यम वांडे, डॉ. अंकित तायडे, डॉ. निशांत वाकोडे (बालरोग तज्ञ), डॉ. आकाश चौधरी आणि डॉ. प्रफुल्ल वानखडे हे आपली सेवा देणार आहेत.
आयोजक:
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी सिद्धार्थ तरुण मंडळ, त्यागमुर्ती माता रमाई उपासिका संघ, संघर्ष अभ्यासिका आणि सिद्धार्थ नगर व भीमनगर येथील समस्त दानापूरवासीय परिश्रम घेत आहेत. या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचा व आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.