*कडक उन्हाचा तडाखा अन् दानापूर च्या महिलांची घरगुती उद्योगात लगबग**पापड, कुरड्या आणि वाळवणाचे पदार्थ बनवण्यात महिला मग्न
*दानापूर: प्रतिनिधी..नंदकिशोर नागपुरे
उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात घरोघरी ‘वाळवणं’ करण्याची लगबग सुरू झाली आहे. दानापूर येथील महिला सध्या पापड, कुरड्या, शेवया आणि मुगाच्या वड्या तयार करण्याच्या कामात गुंतल्या असून, गल्लीबोळांतील अंगणे आणि घरांची गच्ची विविध पांढऱ्याशुभ्र पदार्थांनी फुलून गेल्याचे चित्र दिसत आहे.पारंपारिक कामांना वेगदरवर्षीप्रमाणे चैत्र महिना सुरू होताच गृहिणींची उन्हाळी साठवणुकीच्या पदार्थांची तयारी सुरू होते.

दानापूर परिसरात *विशेषतः* बटाटा चिप्स (आलू चिप्स), तांदळाचे पापड, गव्हाच्या चिकाच्या कुरड्या आणि मुगाच्या वड्या तयार करण्यावर महिलांचा भर आहे. हे पदार्थ वर्षभर टिकणारे असल्याने महिला मोठ्या उत्साहाने आणि समूहाने हे काम करताना दिसत आहेत.अंगणात रंगली ‘मदतफेरी’ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडवत आजही गावात एका महिलेच्या घरचे पदार्थ करण्यासाठी ४-५ महिला एकत्र येतात. *सकाळची वेळ*: उन्हाचा चटका वाढण्यापूर्वी पहाटे ४ वाजेपासूनच कुरड्यांचा चीक शिजवणे आणि पापड लाटण्याचे काम सुरू होते. *सांघिक कार्य*: “एकमेकी साहाय्य करू” या उक्तीप्रमाणे महिला एकमेकींच्या घरी जाऊन मदतीला उभे राहतात, ज्यामुळे कष्टाचे कामही हसत-खेळत पार पडते.*महागाईचा फटका तरीही उत्साह* कायमयंदा डाळी, तेल आणि गॅसच्या किमती वाढल्या असल्या तरी घरच्या चवीसाठी आणि वर्षभराच्या साठवणुकीसाठी या पदार्थांना पर्याय नाही. प्रतिक्रिया”बाजारच्या तयार पाकिटांपेक्षा घरी बनवलेल्या साहित्याची चव आणि शुद्धता वेगळीच असते, म्हणून कितीही कष्ट झाले तरी आम्ही हे पदार्थ घरीच बनवतो,
सौ.शितल नागपुरेगृहिणी दानापुर