
अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी _अनंता मते
दहीगाव रेचा येथे रस्त्या करीता गेल्या तिन दिवसांपासून ग्रामगीताचार्य मनोहर रेचे आमरण उपोषणाला बसले असता त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून आमदार गजानन लवटे यांचा वचननामा तर आमदार ज.मो.अभ्यंकर यांची सभागृहात लक्षवेधी भूमिकेमुळे तर जिल्हा परिषद बांधकाम प्रशासनाच्या लेखी पत्रा नुसार उपोषण कर्ते रेचे गुरुजी यांना ज्यूस पाजून आमरण उपोषणाची सांगता करण्यात आली आहे.
सविस्तर माहिती नुसार,राष्ट्रीय महामार्ग लगत असलेला अंजनगाव सुर्जी ते दहीगाव रेचा या रस्त्याची अवस्था ही अत्यंत दयनीय झाली असून प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन रस्त्या संबंधी अवगत केले. दहीगाव रेचा, शेलगाव, वढाली, धाडी , जनोना, गरजधरी, पळसखेड,खिरपाणी, मेळघाट या सर्व गाव व जंगलांना जोडणारा अती महत्वाचा रस्ता आहे परंतु दुर्दशा एवढी भयंकर की रस्त्याने वाहन तर सोडा साधे चालणेही कठीण झाले आहे त्यात कोणत्याही प्रकारची अजूनही दुरुस्ती किंवा नूतनीकरणाचे काम चालू झाले नसल्याने रस्त्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांचा संताप वाढला होता अंजनगाव सुर्जी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने नागरिकांना दररोज या रस्त्याने वाहतूक व ये जा करावी लागते दररोजच्या दैनंदिन जीवनातील काम काज व मुख्य बाजार पेठ मध्ये दळणवळण करण्या करीता जावे लागते.तसेच विद्यार्थी, वृद्ध, गंभीर रुग्ण, गर्भवती महिला यांना उपचारा करीता रुग्णालयात दाखल करण्या करीता रुग्ण वाहक व वाहन चालकांना मोठ्या अडचणीचा सामना करत रस्त्यावर वाहन चालवावे लागते त्यामुळे रस्ता सुस्थितीत असणे गरजेचे आहे,कारण रस्ता म्हणजे विकास जर रस्ता च नसेल तर अनेक विकासातील कामात अडथळा निर्माण होतो. शेतकऱ्यांना शेतमाल विकण्यासाठी याच खराब रस्त्याचा वापर करावा लागतो. त्यामुळे वाहतूक खर्च सुद्धा वाढला आहे. या सर्व सामाजिक समस्या दूर होऊन रस्ता दुरुस्त होण्या करीता उपोषण कर्ते ग्रामगीताचार्य मनोहर रेचे यांनी दिनांक 12 मार्च पासुन आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात केली होती.परंतु आमदार गजानन लवटे,आमदार ज.मो.अभ्यंकर,जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या मध्यस्थीने साखळी व लाक्षणिक उपोषणाला मोठे यश मिळाले आहे. ठराविक काळात निधीची तरतूद करून रस्त्याची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
दहीगाव रेचा ग्रामवासी सहीत पंचक्रोशीतील नागरिकांनी भक्कम असा पाठिंबा या उपोषणास दिला होता.