
तेल्हारा तालुका प्रतिनिधी :-नंदकिशोर नागपुरे
शेतकरी विरोधी धोरण
अवलंबून अमेरिका सोबत केलेला करार पीक विम्याचे हेक्टरी १७००० हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ टाकण्यासाठी सौंदळा फाटा येथे आज जिल्हा परिषद सर्कल दानापूरच्या वतीने शिवसेना शेतकरी सेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाल विखे यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जि.प सर्कल दानापूरच्या वतीने शिवसेना शेतकरीसेनेचे उपजिल्हाप्रमुख गोपाल विखे यांच्या नेतृत्वात सौंदळा फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी वाहतुकीचा खोळंबा झाला होता.. यावेळी शेतकरी सेनेचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गोपाल विखे, रवी बजारे, संतोष अघडते, तानाजी महारनर, आकाश इंगळे, संजय पांडे, गजानन नेमाडे, प्रकाश विखे, सचिन पांडे, हिरालाल जाम्बळे, राजपाल गवते, गोपाल म्हसाये, दिलीप विखे, बाजीराव विखे, तुकाराम सित्रे, रमेश जवंजाळ, आनंता बाजार, संजय विखे, शिवा ठाकूर, कैलास पिलात्रे, दिनेश वाघ, मनोज खारोडे त्याचप्रमाणे जिल्हा परिषद सर्कलमधील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.