
अंजनगाव सुर्जी तालुका प्रतिनिधी_ अनंता मते
अंजनगाव सुर्जी_दिनांक 23 फेब्रुवारी रोजी कर्मयोगी गाडगे महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरी करत असताना खुद्द महाराजांची जन्मभूमी असलेल्या अंजनगाव सुरजी तालुक्या मात्र एक धक्कादायक चित्र पहायला मिळाले राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गाडगेबाबांच्या विचाराचे स्मरण करत असताना तालुक्यातील स्थानिक लोक प्रतिनिधीं पासून ते वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत कोणालाही गाडगे महाराजांच्या जन्म गावी जाऊन साधे अभिवादन करण्याचे सौजन्य दाखवता आले नाही .या प्रकारामुळे गाडगे महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र संताप व आश्चर्य व्यक्त केले आहे.
हाती झाडू आणि मुखी कीर्तन या माध्यमातून समाज सुधारण्याचा संदेश देणाऱ्या गाडगेबाबांनी याच जन्मभूमी जन्म घेतला त्यांच्या जयंतीनिमित्त शेंडगाव येथे महाराजांच्या विचारावर प्रेम करणाऱ्याची मोठी गर्दी असते. मात्र काल दिवसभरात तालुक्याचे नेतृत्व करणाऱ्या एकाही मोठ्या नेत्यांची किंवा जबाबदार अधिकाऱ्याची पावले जन्माभूमीकडे वळली नाही. जिल्ह्याच्या राजकारणात आणि प्रशासन गाडगे बाबाच्या नावांचा वारंवार उल्लेख केला जातो. परंतु प्रत्यक्ष कृतीची वेळ आल्यावर मात्र सर्वांनीच पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे ज्या महापुरुषांनी देशाला स्वच्छतेचा आणि विषमते विरुद्ध लढण्याचा मार्ग दाखवला त्यांच्या जन्म गावी लोकप्रतिनिधींनी दांडी मारणे हे दुर्दैवी आहे .अशा भावना स्थानिक नागरिकातून व्यक्त केले प्रशासकीय कार्यालयात केवळ फोटोला हार घालून सोपस्कार पाळले जातात तरी प्रत्यक्ष जन्मभूमीत जाऊन आदरांजली वाहण्याची तसदी कोणीही घेतली नाही. हे वास्तव समोर आले प्रशासकीय बैठकांमध्ये किंवा सार्वजनिक व्यासपीठावर गाडगेबाबां च्या कार्याचा गौरव करणारे अधिकारी आणि नेते जयंतीच्या दिवशी मात्र कुठे होते? असा प्रश्न विचारला जात आहे ही बाब केवल प्रो टो कालची नसून ती सामाजिक रुणाची आहे अशी चर्चा सध्या तालुक्यात रंगत आहेत या अनावस्तीमुळे आता स्वच्छता अभियानाचा नारा देणारे सरकार आणि त्यांचे प्रतिनिधी खरोखरच गाडगेबाबां चा विचारांप्रती गंभीर आहेत ?का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
निरक्षर असूनही त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले त्या महान कर्मयोगी गाडगेबाबां च्या जयंती च्या दिवशी पंधरा-सोळा किलो मीटरवर असलेल्या बाबांच्या जन्म गावी प्रशासना तील शिक्षित अधिकाऱ्यांनी एक सौजन्य साध्या अभिवादन यापासून फिरवलेली पाठ संपूर्ण तालुक्या त मात्र चर्चेचा विषय झाला आहे