
राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी: प्रतिनिधी/
धारणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवाझरी ते राणीगाव दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक बोलेरो पिकअप वाहन सुमारे ६० ते ७० फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला असून ७ ते ८ जण गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार, कंजोली आणि राणीगाव येथील १५ ते २० नागरिक मध्य प्रदेशातील देडतलाई येथे बाजार करण्यासाठी गेले होते. बाजार आटोपून परतत असताना, शिवाझरी ते राणीगाव दरम्यानच्या घाटात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहन रिव्हर्समध्ये जाऊन थेट ७० फूट खोल दरीत कोसळले.
हताहत आणि मदतकार्य
मृतक: या अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये १ महिला आणि ३ पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृतक धारणी तालुक्यातील कंजोली येथील रहिवासी आहेत.अपघातात ७ ते ८ जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.