
तेल्हारा तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून गाय बैल चोरिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून तेल्हारा पोलिसांनी एकाहि चोरिचा छडा आज पर्यंत लावला नाही त्यामुळे तालुक्यातील गुरे मालक हतबल झाले आहेत
तेल्हारा तालुक्यातील गावात गाय बैलाचि खुलेपणाने अवैध कटाई राजेरोषपणे चालू असुन या गंभीर बाबीकडे पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे तेल्हारा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाथर्डी घोडेगाव आकोली काळेगाव पचंगव्हाण दहिगाव या परिसरात चोरिचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे गाय बैल मोटरसायकल सायकल आठवढि बाजारातुन मोबाईल चोरि घरफोडी कित्येक झाल्या आहेत पण एकाहि चोरिचा छडा लावण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत आता तर शेतकऱ्यांचे गोठ्यातील शेतात बांधुन ठेवलेले गाया बैल दिवसाढवळ्या चोरटे चोरुन पसार होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत पोलिसात तक्रार दाखल करूनही गाय बैल चोरिचा तपास लागत नाही म्हणून शेतकरी तक्रार दाखल करित नाही दिल्यास चोरि गेलेल्या गाय बैल मिळत नाही यामुळे तेल्हारा तालुक्यात चोरिचे प्रमाण वाढले आहे भाजप शासनाने गाय बैल चे अवैध कटाई वर अनेक नियम लावुनहि त्या नियमांचे अधिकारी पालन करित नाही त्यामुळे तालुक्यातील गावा गावात चोरिचे प्रमाण वाढले आहे या गंभीर बाबीकडे वरिष्ठ प्रशासनाचे लक्ष पुरवुन तालुक्यात होणार्या चोरी थांबवाव्यात अशि मागणि बजरंग दल यांनी केली आहे