
दानापूर (वा)….नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील ग्राम दानापूर येथील राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रचार प्रसारासाठी समर्पित असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच इंगळे गुरुजी श्री गुरुदेव सेवा मंडळ दानापूरच्या माध्यमातून संत तुकडोजी महाराजांचे ग्राम जयंती ,पुण्यतिथी ,संस्कार शिबिर तसेच मानवाच्या कल्याणाकरिता जे थोर संत महात्मे ज्यांनी आपल्या जीवनाची संध्याकाळ या कार्यासाठी केली अशा संतांच्या जयंती, पुण्यतिथीच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतीला उजाळा मिळावा त्याकरिता आयोजन करून त्यांच्या कार्याविषयी प्रबोधन करणे हे गुरुजींचे कार्य. आज त्यांच्याकडे अकोला जिल्हा प्रचार प्रमुख म्हणून जे दायित्व दिल्या गेलं ते खरोखरच अभिनंदनीय असून अकोला जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे प्रचार प्रसाराच्या कार्याची पावती आहे . त्याकरिता अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज अंतर्गत केंद्रीय प्रचार विभागाचे आभार.व्यक्त करण्यात आले.त्याच प्रमाणे प्रेस क्लब व श्रीगुरुदेव सेवा मंडळ तसेच गावकरी मंडळी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सुञसंचालन अॅड अजित सिंह सेंगर यांनी केले तर आभार प्रदर्शन संजय हागे यांनी केले यावेळी भगवान हागे प्रेस क्लब अध्यक्ष, संजय हागे, नंदकिशोर नागपूरे पञकार,शेख राजु , रवींद्र ढाकरे,सुनिल धुरर्डे, हरिदास तायडे, माणिकराव वाघमारे, वसंतराव टाले, रामचंद्र वाघमारे,श्रीकृष्णदादा भगत,ॲडव्होकेट अजितसिंह शेंगर, संतोष वाघमारे,बाळुभाऊ घायल, गणेश दांदळे, अभिषेक इंगळे,आशु भालेराव, महिला मंडळ तथा बालभजन मंडळाच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला.