
तेल्हारा ता.प्रतिनिधी .नंदकिशोर नागपुरे
उन्हाळा सुरु झाला तरी सूध्दा थंडी अजुन ही जानवत आहे. तरी आता फाल्गुन मासारंभ असुन परिसरात पळसाची फुले रंग उधळतांना दिसत आहेत. पळस म्हणजे वृक्ष या पुर्वी लग्न समारंभात पात्र,डवणा,दोरी,रंग,अशा अनेक उपयोगी वस्तु या झाडाच्या पाणांन व खोडांच्या साली पासुन तयार करत त्याच प्रमाणे पळसाच्या झाडांच्या फुलांचा रंग सुध्दा तयार करण्यात येतो असा हा पळस वृक्ष आहे.सातपुड्यातील वारी हनुमान, दानापुर, सौदळा,वारखेड, मार्गावरील आजुबाजुला असलेले वसंत ऋतु त फुललेले पळसांचे झाडे सहाजिकच वाटसरुंना मोहुन टाकत आहेत. सर्वांचे लक्ष्य वेधुन घेत आहेत. उन्हाळा सुरु झाला की झाडांना पानगळ लागते आणी निष्पर्ण वृक्षांचे सांगाडे पाहवयास मिळतात भर उन्हाळ्यात ही काही झाडे बहरत असतात.यातलेच एक पळस वृक्ष लाल,केसरी, जर्द, पिवळा, पळस लक्ष्य वेधुन घेत आहे. पळसाचे झाड हे मध्यम आकाराचे आणी १५ ते १६ फुट उंचीचे असतात, पळसाला जशी केशरी, पिवळी,लाल,अन् दुर्मिळ आढळणारी पांढरी फुलेही आढळतात.मात्र या पळस फुलांना गंध नसतो.पळस फुलताच संपूर्ण जंगल लाल रंगाने न्हाऊन निघते.महाराष्ट्रात पळसाच्या वृक्षांचे आणी शेतकऱ्यांचा फारच जवळचा संबंध आहे. पूर्वसंध्येला पळसाच्या पानांनीच बैलांचा खांदा शेकलाजातो.पळसाची गर्द केशरी, लाल,फुले आपल्याला नेहमीच आकर्षित करतात. ही फुले उमलली की उन्हाळ्याची चाहुल लागते.व येनाऱ्या सर्व ऋतु च्या स्वागतासाठी माळरानही सजलेले दिसुन येत आहे.पळस म्हणजे वृक्ष रानाचा अग्री.इंग्रजीत त्याला फ्लैम आँप फरिस्ट असे म्हटले जाते.थंडी चे दिवस संपुन उन्हाळा सुरु होण्याआधी ऋतुचक्राच्या आसाभोवती फिरनारी समग्र चराचर सुष्टीच जणू संक्रमणाच्या उबरठ्यावर उभी असते.