
अनंता मतेअंजनगाव सुर्जी :-तालका प्रतिनिधी अंजनगाव सुर्जीयेथील कृषी तज्ञ विजय भाऊ लाडोळे यांनी स्थापन केलेले कार्ड संस्थे मार्फत राज्यातील असंख्य कृषी शास्त्रज्ञ एकत्रित आले व त्यांचे कृषी संशोधनाचा अनुभवाचा फार मोठा फायदा विदर्भातील हजारो शेतकऱ्यांना झाला असल्याची माहिती दिनांक 19/ 2 /2026 रोजी झालेले पत्रकार परिषदेत लाडोळे साहेबांनी मांडली आहे. या कार्यासाठी दुर्गम आदिवासी क्षेत्र मेळघाट, अमरावती ,अकोला, खामगाव, यवतमाळ ,बुलढाणा सह अनेक जिल्ह्यात त्यांचे कार्यकर्ते असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये काही महिला शेतकरी बचत गट प्रमुख यांचाही सहभाग आहे. असे सांगताना त्यांनी शेतीला उपयोगी ठरणारी प्रक्रिया राबविणे गरजेचे असल्यामुळे कार्बन क्रेडिट पद्धतीवर भर दिला आहे. यामध्ये कपाशी पीक निघाल्यावर पराठी व शेतातील केरकचरा न जाळता त्यावर बायोग्यास पद्धतीने वापर केल्यास कार्बनचे प्रमाण वाढते आणि शेतीचा पोत सुधारते ही शेती उत्पादकतेला फायदा होणारी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा उपयोग घेण्याचे आवाहन केले आहे. सोयाबीन पिकामुळे शेतकऱ्याला चलन कसे प्राप्त होऊ शकते याचीही माहिती या संस्थेतून दिली आहे .भूजल पुनर्भरण पद्धतीसाठी श्री रविशंकर यांच्या आशीर्वादातून संस्थेला लेमकेन कंपनीचे सबस्क्राईबर व पलटी नांगरतेमुळे उताराचे शेतीला खोल चर पडून पाण्याचा निचरा होतो व जमिनीची पाण्याची पातळी वाढवण्याच्या प्रयोगाबद्दल माहिती दिली. पिकांवर योग्य भावासंबंधीचे निर्यात धोरणात शेतकऱ्यांना मदत करणे असे अनेक प्रयोग करणारे कार्ड संस्थेचे प्रायोगिक क्षेत्राचा फायदा घ्यावा असे आग्रही प्रतिपादन केले आहे. यावेळी पत्रकार मनोहर मुरकुटे, शिवदास मते ,महेंद्र भगत, नंदकिशोर पाटील, अशोक पिंजरकर ,गजानन चांदुरकर सह बरेच लोकप्रतिनिधी हजर होते.