
राजकुमार चिंचोळकर :-
बाळापूर तालुका प्रतिनिधी
तालुक्यातील वाडेगाव येथे मागील काही कालावधी पासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणात निदर्शनास येत असून गावातील जवळपास वीस ते पंचवीस लहान मुलसह नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेवून जखमी केल्याच्या घटना घडल्या असल्याने गावात मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावात नविनच भटक्या कुत्र्यांचे कळप रस्त्यावर बसलेले किंवा फिरताना दिसून येतात तर या भटक्या कुत्र्यांच्या कळपात बहुतांश कुत्रे जखमी अवस्थेत असल्या चे निदर्शनास येत आहे. रस्त्याने लहान शालेय विद्यार्थी किंवा नागरीक येजा करताना भटके कुत्रे अंगावर धावून येतात तर मागील दोन दिवसात गावातील विविध भागात जवळपास वीस ते पंचवीस जणांना कुत्र्यांनी चावा घेवून जखमी केल्याची माहिती नागरिकांच्या कडून सांगितली जात आहे. तसेच महानगर पालिकेच्या हद्दीतील भटक्या कुत्र्यांना पकडून ग्रामीण भागातील गावा जवळ सोडून दिल्या जात असल्याची चर्चा गावात मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. गावात मोठ्या प्रमाणात वाढलेला भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट मुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गंभीर विषया बाबतीत काही नागरिकांनी सांगितले की गावात तसेच मटन विक्रेते पन्नी मध्ये मांसाचे तुकडे तसेच इतर अवयव टाकून पन्नी रस्त्यालगत फेकून दिल्या जातात त्यामुळे भटकी कुत्रे पन्नीतील मांसाचे तुकडे खात असताना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना कुत्रे चावतात. त्यामुळे मांसाचे तुकडे तसेच इतर अवयव रस्त्यालगत न फेकून देता गावा बाहेर फेकून द्यावेत तसेच गावात मोठ्या प्रमाणात असलेल्या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे त्याचप्रमाणे रोडवर कळपाने फिरत असलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे गंभीर घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून गावात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येते गावातील काही नागरिकांना कुत्रे चावल्याच्या घटना उघडकीस येत आहे त्यामुळे संमधीत विभागाकडून गावातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
सागर सरप
अध्यक्ष
गाव तंटामुक्त समिती वाडेगाव.