
अकोट तालुका :-प्रतिनिधी प्रभाकर बोरकर
भारतीय संविधान स्वीकृतीला ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृतमहोत्सव निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर आणि समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व शासकीय वसतिगृह, निवासी शाळा, अनुदानित व अशासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा दिनांक १५/११/२०२५ रोजी यशस्वीरित्यापार पडली.
या स्पर्धेत अनु. जाती व नवबौद्ध मुलांच्या शा.नि. शाळा पाटसुळ येथील विद्यार्थी प्रणव धीरज गवळी
प्रणव धीरज गवई (इयत्ता १० वी) याने शालेय गटातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकाविला.
या स्पर्धेसाठी राज्यस्तरावर समाजकल्याण महाराष्ट्रामधीलकार्यरत (वसतिगृहे, 90 निवासी शाळा) मधील हजारो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
सहा. आयुक्त समाज कल्याण अकोला यांनी प्रणव धीरज गवई व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांचे अभिनंदन केले. संविधान दिन अमृतमहोत्सवी विद्यार्थ्यामध्ये संविधान जागृती होऊन संविधान एक जागरूक नागरिक घडवण्यासाठी ही निबंध स्पर्धा महत्त्वाची आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या स्पर्धेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री.रवींद्र जळमकर सर, प्रवीण जिरापूरे सर, श्री. दिनेश नेमाडे सर, श्री . सुनील वानखडे सर, श्रीमती रुपाली पोकळे मॅडम व शीतल पखान मॅडम यांनी विशेष तयारी करून घेतली व मार्गदर्शन केले. या यशाबद्दल सहा.आयुक्त अकोला श्री.मारुती वाठ साहेब आणि समाज कल्याण निरीक्षक श्री.उमेश वाघ सर यांनी प्रणव धीरज गवई अनुसूचित जाती निवासी शाळेतील शिक्षक वृंद यांची परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.. कारण या शाळेतील सर्व कर्मचारी हे प्रत्येक विद्यार्थ्याला जोपासतात त्यामुळे आज निवासी शाळेचा निकाल सुद्धा या स्पर्धेच्या युगात 100% राहते यामुळे पालक वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.