
तेल्हारा प्रतिनीधी :- बाळासाहेब नेरकर
हिवरखेड येथील जूनी चावडी बारगणपुरा कामठा हिवरखेड च्या श्री गजानन महाराज मानव सेवा समिती रजि नंबर ई 1334द्वारा श्री गजानन महाराज प्रगट दिना निमीत्त गजानन विजय ग्रंथ पारायण व अखंड नामसकिर्तण सप्ताह दिनांक 1/2/26 रविवार ते 8/2/26 रविवार पर्यंत भागवताचार्य हभप परसराम महाराज सातपुते रा सूनगाव यांचे व्यासपिठ नेतृत्वात आयोजित केले असून सकाळी 5ते6 काकडा, पारायण सकाळी 10 ते12 , तर सध्यांकाळी 6 ते 7 हरीपाठ तर राञीला 8:30 ते 10:30 पर्यंत महाराष्टातील नामवंत किर्तनकाराची दिनाक 1/2/26 पासून 8/2/26 पर्यंत अनूक्रमे हभप बळीराम महाराज गायकवाड, हभप कृष्णा महाराज सदाफळे, हभप ज्ञानेश्र्वर महाराज भालतिळक, हभप कू धनश्रीताई बांते, हभप कू साक्षीताई लूंगे,हभप भारुडकार रोहन महाराज रोकडे, भागवताचार्य हभप संजिवनीताई ढगे, तर व्यास पिठाधिष भागवताचार्य परसराम महाराज सातपुते यांचे काल्याचे किर्तण सकाळी 9 ते12 होनार तर श्री चा प्रगट महोत्सवानंतर सध्याकाळी 7 ते 10 पर्यत महाप्रसाद होईल या मधे ग्रथ दिडी व श्री ची प्रतीमा ट्रक्टरवर सजवून विठ्ठल मंदीर वारकरी ,भजनी मंडळ महीला भंजनी मंडळ कार्ला, सौदळा दानापुर हिंगणी येंथील वारकरी भजनी मंडळाचा वरील कार्यक्रमाला सहभाग राहनार असून मंदीराचे बाधंकामाला व लेकीबाई कडुन मंदिराचे कळसासाठी वर्गणी साठी सहकार्य करावे असे आव्हाहन सूद्धा गजानन महाराज मानव सेवा समिती जूनी चावडी बारगण पुरा कामठा यांनी केली आहे