
तालूका प्रतिनिधी:- नंदकिशोर नागपुरे
तेल्हारा तालुक्यातील दानापुर येथे श्री संत शिरोमणी रोहिदास महाराज ६४९ वि.जयंती संपन्न. येथील श्री गुरुदेव सेवा मंडळाचे उपासक श्री वसंतरावजी टाले यांच्या निवास स्थानी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात सामुदायिक प्रार्थनेने झाली. सर्वप्रथम सर्व उपासकांनी संत शिरोमणी गुरु रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन केले.संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचे कार्याविषयी श्री अजित सिंह सेंगर यांनी आपले चिंतन प्रकट केले. त्यानंतर नऊ वाजता भजन संध्याला सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये श्री गुरुदेव भजन मंडळांनी आपली सेवा रोहिदास महाराजांच्या चरणी समर्पित करुण विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. अजित सिंह सेंगर, गोपाल भाऊ बोरसे ,समाधान येऊल, नंदू विखे ,श्रीहरी अघडते,गोपाल झुणे, विक्रम नांदुरकर ,नंदकिशोर नागपुरे पत्रकार, भास्कर दांदळे गणेश दांदळे, दीपक वाघमारे संजय सिंह चव्हाण, रवींद्र ठाकरे, अशोक इंगळे ,अभिषेक माणिकराव इंगळे गुरुजी ,अंकुश दांदळे. बाळकृष्ण बावणे, बाळू घायल तसेच समस्त गावकरी मंडळी सहभागी होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने करण्यात आली.